S M L

रेल्वे बोर्डाच्या परीक्षेसाठी आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांचा मृत्यू अपघातामुळेच

रेल्वे बोर्डाच्या परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीमुळेच एका बिहारी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनानं नुकत्याच जारी केलेल्या फूटेजमधून हा विद्यार्थी अपघातात मृत्यू पावल्याचं लक्षात आलं आहे. यामळे राज ठाकरेंवरचा खुनाचा गुन्हा रद्द होण्याची शक्यता आहे.या विद्यार्थाचा मृत्यू हा एक अपघात असल्याचा खुलासाही रेल्वे प्रशासनानं केलाय. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या सी.सी.टी.व्ही. कॅमे-यानं टिपलेलं फूटेज मुंबई रेल्वे ऑथॉरिटीनं नुकतच प्रसिद्ध केलंय. त्यात पवनचा मृत्यू मारहाणीत नाही तर रेल्वेत चढताना पाय घसरून पडल्यामुळे झाल्याचं स्पष्ट होतंय. पवन हा भाईदरला जाण्यासाठी परीक्षेच्या दिवशी पहाटे साडेसहा वाजता अंधेरी स्टेशनवरून रेल्वे पकडत होता. त्यावेळी त्याठिकाणी जास्त गर्दीही नव्हती. पण, पवन रेल्वेत चढू शकला नाही. त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. हा अपघात असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. या खुलाशामुळे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा दावा खोटा ठरला आहे. पवनचा मृत्यू मनसेच्या मारामारीत झाला असा आरोप लालूप्रसाद यांनी केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2008 11:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2008 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close