S M L

ऊस हप्त्यासाठी बारामतीत आंदोलन

3 सप्टेंबरउसाला 2200 रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. बारामतीत या आंदोलनाला सुरुवात झाली. सोमेश्वर कारखान्यावर शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर साखरेला प्रतिक्विंटल 3 हजार रुपये भाव मिळावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे. भाव कमी मिळाला, तर कारखान्यातून साखरच बाहेर पडू दिली जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर कृषीमंत्री शरद पवारांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 01:56 PM IST

ऊस हप्त्यासाठी बारामतीत आंदोलन

3 सप्टेंबर

उसाला 2200 रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. बारामतीत या आंदोलनाला सुरुवात झाली.

सोमेश्वर कारखान्यावर शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर साखरेला प्रतिक्विंटल 3 हजार रुपये भाव मिळावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.

भाव कमी मिळाला, तर कारखान्यातून साखरच बाहेर पडू दिली जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर कृषीमंत्री शरद पवारांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close