S M L

अमरावतीत साथीच्या आजारात 5 जणांचा मृत्यू

3 सप्टेंबरअमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या आजारात गुरूवारी एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला. तर आठवडाभरात मृत्यू पावलेल्यांची संख्या 13 वर गेली आहे. वरूड तालुक्यात साथ पसरली असताना सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. त्याचा रूग्णांना फटका बसलाय. वेळेवर औषध न मिळाल्यामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान या विषाणूजन्य तापाचे नमुने पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पण अचूक निदान करण्यात प्रयोगशाळेला अजूनही यश आलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 03:11 PM IST

अमरावतीत साथीच्या आजारात 5 जणांचा मृत्यू

3 सप्टेंबर

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या आजारात गुरूवारी एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला.

तर आठवडाभरात मृत्यू पावलेल्यांची संख्या 13 वर गेली आहे. वरूड तालुक्यात साथ पसरली असताना सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. त्याचा रूग्णांना फटका बसलाय.

वेळेवर औषध न मिळाल्यामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान या विषाणूजन्य तापाचे नमुने पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पण अचूक निदान करण्यात प्रयोगशाळेला अजूनही यश आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close