S M L

फी नियंत्रणाच्या मागणीसाठी मोर्चा

3 सप्टेंबरखाजगी शाळांच्या फीवर नियंत्रण ठेवणारा राज्य सरकारचा 15 जुलैचा जी आर हायकोर्टाने रद्द केला आहे. आता तरी फी नियंत्रणासाठी राज्य सरकारने ठोस कायदा करावा, अशी मागणी पालकांनी आज पुण्यामध्ये केली. त्यासाठी पालकांनी अनोख्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी अशोकाच्या झाडाची पूजा करुन त्याला साकडे घातले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतंच अशोकाचे झाड मतलबी असते, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती. त्यामुळे रोझरी शाळेतल्या पालकांनी अशोकाच्या झाडाला आज साकडे घातले. आणि सरकारचा फीवाढीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे शाळेने केलेली भरमसाठ फीवाढ मागे घेण्यासाठी पुण्यातीलच सेंट क्रिसेन्ट शाळेतील पालकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 03:21 PM IST

फी नियंत्रणाच्या मागणीसाठी मोर्चा

3 सप्टेंबर

खाजगी शाळांच्या फीवर नियंत्रण ठेवणारा राज्य सरकारचा 15 जुलैचा जी आर हायकोर्टाने रद्द केला आहे. आता तरी फी नियंत्रणासाठी राज्य सरकारने ठोस कायदा करावा, अशी मागणी पालकांनी आज पुण्यामध्ये केली.

त्यासाठी पालकांनी अनोख्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी अशोकाच्या झाडाची पूजा करुन त्याला साकडे घातले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतंच अशोकाचे झाड मतलबी असते, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती.

त्यामुळे रोझरी शाळेतल्या पालकांनी अशोकाच्या झाडाला आज साकडे घातले. आणि सरकारचा फीवाढीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तर दुसरीकडे शाळेने केलेली भरमसाठ फीवाढ मागे घेण्यासाठी पुण्यातीलच सेंट क्रिसेन्ट शाळेतील पालकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close