S M L

ओलीस ठेवलेल्या एका पोलिसाची हत्या

3 सप्टेंबरबिहारमध्ये माओवाद्यांनी अपहरण केलेल्या एका पोलिसाचा मृतदेह लखिसराई जंगलात सापडला. हा मृतदेह सब इन्स्पेक्टर लोकस टेटे यांचा असल्याची खात्री पटली आहे. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर टेटे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. मृतदेहासोबत माओवाद्यांनी लिहिलेली एक चिठ्ठीही सापडली. त्यात आपल्या 8 सहकार्‍यांच्या सुटकेची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी दिलेली तिसरी डेडलाईन आज सकाळी 10 वाजता संपली. त्यामुळे बिहारमध्ये हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा दलांची आणखी कुमक पाठवली आहे. अजूनही तीन पोलीस माओवाद्यांच्या ताब्यात आहेत. पाच दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सरकार आणि माओवाद्यांकडे कळकळीची विनंती केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 03:40 PM IST

ओलीस ठेवलेल्या एका पोलिसाची हत्या

3 सप्टेंबर

बिहारमध्ये माओवाद्यांनी अपहरण केलेल्या एका पोलिसाचा मृतदेह लखिसराई जंगलात सापडला. हा मृतदेह सब इन्स्पेक्टर लोकस टेटे यांचा असल्याची खात्री पटली आहे.

पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर टेटे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. मृतदेहासोबत माओवाद्यांनी लिहिलेली एक चिठ्ठीही सापडली. त्यात आपल्या 8 सहकार्‍यांच्या सुटकेची मागणी त्यांनी केली आहे.

यासाठी दिलेली तिसरी डेडलाईन आज सकाळी 10 वाजता संपली. त्यामुळे बिहारमध्ये हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा दलांची आणखी कुमक पाठवली आहे.

अजूनही तीन पोलीस माओवाद्यांच्या ताब्यात आहेत. पाच दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सरकार आणि माओवाद्यांकडे कळकळीची विनंती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close