S M L

जगातील सर्वाधिक मोठा पतंग कोकणात

4 सप्टेंबरजगातील सर्वात मोठ्या पतंगाची जात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडली आहे. फुलपाखराच्या प्रजातीतील या पतंगाचे नाव 'ऍटेकस ऍटलस' असे असून, या दोन्ही ठिकाणी मादी जातीचे हे पतंग आढळून आले आहेत. सिंधुदुर्गात देवगडजवळ सापडलेल्या या मादी पतंगाच्या पंखांची लांबी तब्बल 22 सेंटीमीटर आहे. या मादीने घातलेली 85 अंडीही सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील वाघरण भागातही एक मादी पतंग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संंशोधकांना आढळून आला आहे. पर्यावरणाला अतिशय पोषक समजल्या जाणार्‍या पश्चिम घाट भागाचे महत्व त्यामुळे वाढले आहे. हा भाग किती एकोसेन्सिटीव्ह आहे याचेच हे एक उदाहरण, असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले आहे. याबाबत बीएनएचएस संशोधक डॉ. दीपक आपटे यांच्याशी, आमचे रिपोर्टर दिनेश केळुसकर यांनी बातचीत केली...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2010 11:35 AM IST

जगातील सर्वाधिक मोठा पतंग कोकणात

4 सप्टेंबर

जगातील सर्वात मोठ्या पतंगाची जात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडली आहे. फुलपाखराच्या प्रजातीतील या पतंगाचे नाव 'ऍटेकस ऍटलस' असे असून, या दोन्ही ठिकाणी मादी जातीचे हे पतंग आढळून आले आहेत.

सिंधुदुर्गात देवगडजवळ सापडलेल्या या मादी पतंगाच्या पंखांची लांबी तब्बल 22 सेंटीमीटर आहे. या मादीने घातलेली 85 अंडीही सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील वाघरण भागातही एक मादी पतंग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संंशोधकांना आढळून आला आहे.

पर्यावरणाला अतिशय पोषक समजल्या जाणार्‍या पश्चिम घाट भागाचे महत्व त्यामुळे वाढले आहे. हा भाग किती एकोसेन्सिटीव्ह आहे याचेच हे एक उदाहरण, असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले आहे.

याबाबत बीएनएचएस संशोधक डॉ. दीपक आपटे यांच्याशी, आमचे रिपोर्टर दिनेश केळुसकर यांनी बातचीत केली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2010 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close