S M L

फिक्सिंग प्रकरणी आरोप-प्रत्यारोप

4 सप्टेंबरस्पॉट फिक्सिंग प्रकरणाला रोज नवे रंग चढत आहेत. आयसीसी आणि पाक क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे नवीन सत्र सुरू झाले आहे. पाक बोर्ड तर थेट आयसीसीवरच अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करत आहे. फिक्सिंगचा आरोप असलेले पाक खेळाडू चौकशीनंतर निर्दोष आढळले तर पाक बोर्ड हे पाऊल उचलणार आहे. इंग्लंडमधील पाक हायकमिशननेही काल आयसीसीवर आगपाखड केली होती. आणि पाक खेळाडूंविरुद्ध कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. यावर आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप लागलीच फेटाळून लावले. तसेच हरुन लोगार्ट यांच्याकडून या प्रकरणाची माहिती आपण नियमितपणे घेत आहोत असेही पवार यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2010 11:43 AM IST

फिक्सिंग प्रकरणी आरोप-प्रत्यारोप

4 सप्टेंबर

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाला रोज नवे रंग चढत आहेत. आयसीसी आणि पाक क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे नवीन सत्र सुरू झाले आहे.

पाक बोर्ड तर थेट आयसीसीवरच अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करत आहे. फिक्सिंगचा आरोप असलेले पाक खेळाडू चौकशीनंतर निर्दोष आढळले तर पाक बोर्ड हे पाऊल उचलणार आहे.

इंग्लंडमधील पाक हायकमिशननेही काल आयसीसीवर आगपाखड केली होती. आणि पाक खेळाडूंविरुद्ध कट रचला जात असल्याचा आरोप केला होता.

यावर आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप लागलीच फेटाळून लावले. तसेच हरुन लोगार्ट यांच्याकडून या प्रकरणाची माहिती आपण नियमितपणे घेत आहोत असेही पवार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close