S M L

मनस्वी कलाकार पिकासोचा आज 128 वा स्मृतीदिन

विसाव्या शतकाच्या पेंटिंग आणि शिल्प कलेवर एका मनस्वी कलाकाराची छाया होती. आणि तो कलाकार म्हणजे पाब्लो पिकासो.आज त्याचा 128 वा स्मृतीदिन पिकासो एक कलंदर व्यक्तिमत्व, कलाजगतात सुवर्णाक्षरात लिहीलेलं एक नाव. अनेक कलाकारांचं प्रेरणास्थान. कलेच्या या वादळाने सगळ्या कलाकृतींवर आपली छाप पाडली, आणि प्रत्येक कलाकृती ही मास्टर पीस म्हणून तयार झाली. त्याच्या प्रसिध्द कलाकृतींपैकी गोर्निका, विदूषक, मुलँ द ला गालत्ते, ले दम्वाझेल दाव्हियाँ, मिनोटॉर, सेन्टॉर, या काही कलाकृती आहेत. त्या शिवाय बॅले रूस, द थ्री कॉर्नर्ड हॅट आणि परेड या बॅलेच्या प्रयोगासाठी नेपथ्य आणि वेषभूषेचं काम त्यानं केलं. पिकासोच्या पेंटिंग्जमधला ब्ल्यू पीरिअड आणि पिंक पीरिअड प्रसिध्द आहेत. या दोन्ही कालखंडात त्याने निळ्या आणि गुलाबी रंगात चित्र काढली. आणि त्यानंतर महत्वाचा म्हणजे क्युबिझमचा पीरिअड होता. या काळात कला समीक्षकांनी त्याला क्युबिझमचा प्रणेता मानलं. पण आता ह्या कलाकृती खुपचं दुर्मिळ झालेल्या आहेत. सध्या पिकासोच्या या दुर्मिळ कलाकृतींच्या बाबतीत ब-याचं कॉन्ट्रवर्सिज सुरू आहेत. कॉन्ट्रवर्सिज काहीही असोत, पण त्यामुळे पिकासोचं कलाक्षेत्रातलं महत्व कधीचं कमी होणार नाहिये. पिकासो हा त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून कलाकारांच्या मनावर नेहमीचं अधिराज्य गाजवत रहाणार हे मात्र तितकच खरं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2008 02:00 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2008 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close