S M L

82 लाख महाकोषा ऐवजी साहित्य परिषदेकडेच

05 सप्टेंबर83 व्या पुणे साहित्य संमेलनात शिल्लक राहिलेल्या 82 लाख रुपये रकमेचा चेक महाराष्ट्र साहित्य परिषदेनं स्वीकारला आहे. हे पैसे महाकोषात जमा व्हायला हवे होते, अशी मागणी साहित्यकांची होती. पण ते साहित्य परिषदेकडे जमा झाले. त्यामुळे आता एक नवाच वाद सुरू होण्याची शक्यता आहे. स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी हा चेक परिषदेकडे दिला होता. सतीश देसाईंच्या पुण्यभूषण या संस्थेकडे हे पैसे जमा होते. त्यावरून साहित्य संमेलनाच्या खर्चाच्या हिशोबाचा वाद सुरू होता. साहित्य परिषदेनं आज एक पत्रकार परिषद घेऊन या 82 लाख रुपयांच्या रकमेबाबत खुलासा केला. साहित्य परिषदेनं हे पैसे घेणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. मूळ रकमेला हात न लावता, त्यावर आलेल्या व्याजावर इतर उपक्रम राबवले जातील, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2010 04:15 PM IST

82 लाख महाकोषा ऐवजी साहित्य परिषदेकडेच

05 सप्टेंबर

83 व्या पुणे साहित्य संमेलनात शिल्लक राहिलेल्या 82 लाख रुपये रकमेचा चेक महाराष्ट्र साहित्य परिषदेनं स्वीकारला आहे. हे पैसे महाकोषात जमा व्हायला हवे होते, अशी मागणी साहित्यकांची होती.

पण ते साहित्य परिषदेकडे जमा झाले. त्यामुळे आता एक नवाच वाद सुरू होण्याची शक्यता आहे. स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी हा चेक परिषदेकडे दिला होता.

सतीश देसाईंच्या पुण्यभूषण या संस्थेकडे हे पैसे जमा होते. त्यावरून साहित्य संमेलनाच्या खर्चाच्या हिशोबाचा वाद सुरू होता. साहित्य परिषदेनं आज एक पत्रकार परिषद घेऊन या 82 लाख रुपयांच्या रकमेबाबत खुलासा केला.

साहित्य परिषदेनं हे पैसे घेणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. मूळ रकमेला हात न लावता, त्यावर आलेल्या व्याजावर इतर उपक्रम राबवले जातील, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2010 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close