S M L

खताचा काळाबाजार करणारे मोकाटच

6 सप्टेंबर उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा इथे खताचा काळाबाजार करणारे म्होरके अजूनही मोकाट आहेत. दहा दिवसांपूर्वी सांगलीतून बीडला जाणारे खताचे 3 ट्रक येरमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरवर गुन्हे दाखल केले. पण काळाबाजार करणारा मुख्य सूत्रधार आणि ट्रक मालक यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दहा दिवस उलटून गेल्यानंतरही यातील प्रमुख आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आले. पकडण्यात आलेले खत बीडमधील एक मंत्री आणि आमदाराचे आहे. त्यांच्या दबावामुळे याप्रकरणी कारवाईला उशीर होत असल्याचे समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 10:52 AM IST

खताचा काळाबाजार करणारे मोकाटच

6 सप्टेंबर

उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा इथे खताचा काळाबाजार करणारे म्होरके अजूनही मोकाट आहेत.

दहा दिवसांपूर्वी सांगलीतून बीडला जाणारे खताचे 3 ट्रक येरमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरवर गुन्हे दाखल केले.

पण काळाबाजार करणारा मुख्य सूत्रधार आणि ट्रक मालक यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दहा दिवस उलटून गेल्यानंतरही यातील प्रमुख आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आले.

पकडण्यात आलेले खत बीडमधील एक मंत्री आणि आमदाराचे आहे. त्यांच्या दबावामुळे याप्रकरणी कारवाईला उशीर होत असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close