S M L

शब-ए-कद्र उत्साहात साजरी

6 सप्टेंबरइस्लाम धर्मात रमजान महिन्यात येणारी धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि पवित्र मानली जाणारी शब-ए-कद्र आज साजरी केली जात आहे. आजच्या रात्री मुस्लिम बांधव विविध मस्जिदीमध्ये नमाज अदा करुन विशेष प्रार्थना करतात. पवित्र ईश्वरीय ग्रंथ कुराण शरीफ प्रेषित मोहमंद पैगंबर यांच्याकडे आजच्या दिवशी सोपवण्यात आला होता. त्यामुळे रात्रभर जागरण करुन मुस्लिम बांधव सर्वत्र कुराण शरीफचे पठण करतात. दान धर्माला या महिन्यात मोठे महत्व असल्याने मुस्लिम बांधव दान करतात. शिवाय मस्जिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 11:56 AM IST

शब-ए-कद्र उत्साहात साजरी

6 सप्टेंबर

इस्लाम धर्मात रमजान महिन्यात येणारी धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि पवित्र मानली जाणारी शब-ए-कद्र आज साजरी केली जात आहे.

आजच्या रात्री मुस्लिम बांधव विविध मस्जिदीमध्ये नमाज अदा करुन विशेष प्रार्थना करतात. पवित्र ईश्वरीय ग्रंथ कुराण शरीफ प्रेषित मोहमंद पैगंबर यांच्याकडे आजच्या दिवशी सोपवण्यात आला होता.

त्यामुळे रात्रभर जागरण करुन मुस्लिम बांधव सर्वत्र कुराण शरीफचे पठण करतात. दान धर्माला या महिन्यात मोठे महत्व असल्याने मुस्लिम बांधव दान करतात. शिवाय मस्जिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close