S M L

लवासा आंदोलकांवर हल्ला

6 सप्टेंबरपुणे जिल्ह्यातील लवासा प्रकरणाला विरुद्ध आंदोलन करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांवर आज हल्ला करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या जनआंदोलन समन्वय समितीच्या 8 कार्यकर्त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने हे कार्यकर्ते या हल्ल्यातून वाचले आहेत. तर त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. दासवे गावात दुपारी एक वाजता हा प्रकार घडला. आंदोलकांच्या समन्वयक सुनीती सु. र. यांनी 'आमचा पाठलाग करून आमच्यावर हल्ला करण्यात आला', असा आरोप केला आहे. सुमारे 150 लोकांनी हल्ला केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लवासा ही हिल सिटी उभारण्यासाठी जमिनी संपादित करण्याप्रकरणी हे आंदोलक शेतकर्‍यांची बाजू मांडत आहेत. तर शेतकर्‍यांमध्ये लवासाला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले आहेत. या जमीन संपादनाबाबत राज्य सरकारकडूनही चौकशी करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 01:41 PM IST

लवासा आंदोलकांवर हल्ला

6 सप्टेंबर

पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकरणाला विरुद्ध आंदोलन करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांवर आज हल्ला करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या जनआंदोलन समन्वय समितीच्या 8 कार्यकर्त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला आहे.

सुदैवाने हे कार्यकर्ते या हल्ल्यातून वाचले आहेत. तर त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. दासवे गावात दुपारी एक वाजता हा प्रकार घडला.

आंदोलकांच्या समन्वयक सुनीती सु. र. यांनी 'आमचा पाठलाग करून आमच्यावर हल्ला करण्यात आला', असा आरोप केला आहे. सुमारे 150 लोकांनी हल्ला केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लवासा ही हिल सिटी उभारण्यासाठी जमिनी संपादित करण्याप्रकरणी हे आंदोलक शेतकर्‍यांची बाजू मांडत आहेत. तर शेतकर्‍यांमध्ये लवासाला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले आहेत.

या जमीन संपादनाबाबत राज्य सरकारकडूनही चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close