S M L

नदीतील गाळामुळे पुण्यात आठ महिन्यात 50 बळी

6 सप्टेंबरपुण्याच्या मुठा नदीमध्ये निर्माल्य टाकण्यासाठी गेलेले पोलीस वायरलेस विभागाचे कर्मचारी विष्ण पारखे नदी पात्रात तोल जाऊन पडले. 24 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. नदीला फारसे पाणी नसतानाही पारखे बेपत्ता होण्यामागे नदीतील गाळ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या 8 महिन्यांमध्ये अशा प्रकारे 50 व्यक्ती नदीमध्ये पडल्याची माहिती फायर ब्रिगेडने दिली आहे. नदीकाठी ठिकठिकाणी निर्माल्य कलश असूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा नदीमध्ये टाकतात. तोही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून. निर्माल्य, प्लॅस्टिक, कचरा या सगळ्याच गोष्टींमुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे.एक नजर टाकूयात गेल्या 8 महिन्यांत किती लोक बुडालेत, त्यावर...जानेवारी - 3 फेब्रुवारी -7मार्च- 9एप्रिल-7मे-13जून-3जुलै- 4ऑगस्ट- 4

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 03:27 PM IST

नदीतील गाळामुळे पुण्यात आठ महिन्यात 50 बळी

6 सप्टेंबर

पुण्याच्या मुठा नदीमध्ये निर्माल्य टाकण्यासाठी गेलेले पोलीस वायरलेस विभागाचे कर्मचारी विष्ण पारखे नदी पात्रात तोल जाऊन पडले. 24 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही.

नदीला फारसे पाणी नसतानाही पारखे बेपत्ता होण्यामागे नदीतील गाळ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या 8 महिन्यांमध्ये अशा प्रकारे 50 व्यक्ती नदीमध्ये पडल्याची माहिती फायर ब्रिगेडने दिली आहे.

नदीकाठी ठिकठिकाणी निर्माल्य कलश असूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा नदीमध्ये टाकतात. तोही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून. निर्माल्य, प्लॅस्टिक, कचरा या सगळ्याच गोष्टींमुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे.

एक नजर टाकूयात गेल्या 8 महिन्यांत किती लोक बुडालेत, त्यावर...

जानेवारी - 3

फेब्रुवारी -7

मार्च- 9

एप्रिल-7

मे-13

जून-3

जुलै- 4

ऑगस्ट- 4

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close