S M L

लगबग बैलपोळ्याची...

7 सप्टेंबरबळीराजाला शेतीच्या कामात मदत करणार्‍या बैलांचा सण म्हणजे बैलपोळा. या सणाची लगबग आता बाजारपेठांमधून दिसू लागली आहे. बैलपोळ्याच्या तयारीसाठी सध्या गावागावांतील बाजारपेठा घुंघरमाळा, रंगीत गोंडे आणि विविध रंगांनी सजल्या आहेत.आपला बैल देखणा दिसावा यासाठी शेतकरी बाजारपेठेतील व्यापार्‍यांशी घासाघीस करत या वस्तू घेताना दिसत आहे. त्यासाठी बैलाच्या शिंगांना धार काढणे आणि त्याच्या पायाला नाल ठोकण्यासाठीही अनेकजण बाजारपेठेत येत आहेत. राज्यभरात यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा पोळा दणक्यात साजरा करण्यासाठी तो सरसावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 12:22 PM IST

लगबग बैलपोळ्याची...

7 सप्टेंबर

बळीराजाला शेतीच्या कामात मदत करणार्‍या बैलांचा सण म्हणजे बैलपोळा. या सणाची लगबग आता बाजारपेठांमधून दिसू लागली आहे.

बैलपोळ्याच्या तयारीसाठी सध्या गावागावांतील बाजारपेठा घुंघरमाळा, रंगीत गोंडे आणि विविध रंगांनी सजल्या आहेत.आपला बैल देखणा दिसावा यासाठी शेतकरी बाजारपेठेतील व्यापार्‍यांशी घासाघीस करत या वस्तू घेताना दिसत आहे.

त्यासाठी बैलाच्या शिंगांना धार काढणे आणि त्याच्या पायाला नाल ठोकण्यासाठीही अनेकजण बाजारपेठेत येत आहेत. राज्यभरात यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा पोळा दणक्यात साजरा करण्यासाठी तो सरसावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close