S M L

पनवेलमधील वसतीगृहातील जेवणात अळ्या

7 सप्टेंबरपनवेलच्या खांदा कॉलनीतील सरकारी आदिवासी वसतिगृहावर पनवेल तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांनी काल छापे घातले. या छाप्यात अनेक गैरप्रकार उघडकीस आले. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या जेवणात अळ्या आणि किडे सापडत असल्याची तक्रार गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र या विषयी तक्रार केल्यास वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल, अशी धमकी आपल्याला दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर अखेर अधिकर्‍यांनी या वसतीगृहावर छापे घातले. तेव्हा या तक्रारीत तथ्य आढळून आले. सरकारी अनुदानही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या पाहणीत आढळून आले. याबाबतचा चौकशी अहवाल लवकरच सरकारला सादर करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 12:42 PM IST

पनवेलमधील वसतीगृहातील जेवणात अळ्या

7 सप्टेंबर

पनवेलच्या खांदा कॉलनीतील सरकारी आदिवासी वसतिगृहावर पनवेल तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांनी काल छापे घातले. या छाप्यात अनेक गैरप्रकार उघडकीस आले.

वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या जेवणात अळ्या आणि किडे सापडत असल्याची तक्रार गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

मात्र या विषयी तक्रार केल्यास वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल, अशी धमकी आपल्याला दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

या पार्श्वभूमीवर अखेर अधिकर्‍यांनी या वसतीगृहावर छापे घातले. तेव्हा या तक्रारीत तथ्य आढळून आले. सरकारी अनुदानही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या पाहणीत आढळून आले.

याबाबतचा चौकशी अहवाल लवकरच सरकारला सादर करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close