S M L

धुळ्यातील तरुणांचे मुंबईत उपोषण

7 सप्टेंबरधुळे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये क आणि ड वर्गाच्या भरतीसाठी उमेदवार निवडण्यात आले आहेत. पण अजूनही त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली नाहीत. त्यामुळे या तरुणांनी आता उपोषण सुरू केले आहे. मुंबईत आझाद मैदानात गेल्या तीन महिन्यांपासून हे उमेदवार आंदोलनाला बसले आहेत. पण सरकारने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. यापैकी तीन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मे 2010 मध्ये त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र राज्य सरकारच्या जून 2010 नवीन भरती करण्याचा फटका त्यांना बसत आहे. खरे तर मेमध्येच नांदेड , नाशिक , सातारा या जिल्ह्यांमध्ये झालेली भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे आपल्यालाही नोकरी मिळावी अशी मागणी ही मुले करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 01:00 PM IST

धुळ्यातील तरुणांचे मुंबईत उपोषण

7 सप्टेंबर

धुळे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये क आणि ड वर्गाच्या भरतीसाठी उमेदवार निवडण्यात आले आहेत. पण अजूनही त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली नाहीत.

त्यामुळे या तरुणांनी आता उपोषण सुरू केले आहे. मुंबईत आझाद मैदानात गेल्या तीन महिन्यांपासून हे उमेदवार आंदोलनाला बसले आहेत.

पण सरकारने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. यापैकी तीन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मे 2010 मध्ये त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र राज्य सरकारच्या जून 2010 नवीन भरती करण्याचा फटका त्यांना बसत आहे.

खरे तर मेमध्येच नांदेड , नाशिक , सातारा या जिल्ह्यांमध्ये झालेली भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे आपल्यालाही नोकरी मिळावी अशी मागणी ही मुले करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close