S M L

रिदमिक जिमनॅस्टिक्समध्ये मुंबईतील मुली

8 सप्टेंबरकॉमनवेल्थ स्पर्धा यंदा दिल्लीत होणार आहेत. आणि घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा भारतीय ऍथलीट्सना मिळणार आहे. त्याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे, तो आपल्याकडे फारशा प्रचलित नसलेल्या खेळांना आणि त्यातील खेळाडूंना. रिदमिक जिमनॅस्टिक्स या खेळात भारतीय टीम फक्त दुसर्‍यांदा उतरत आहे. सांघिक प्रकारात तीन मुलींची भारतीय टीम उतरणार आहे. गंमत म्हणजे या तीनही मुली मुंबईतीलच आणि एकाच कोचकडे प्रशिक्षण घेणार्‍या आहेत. क्षिप्रा जोशी, अक्षता शेटे आणि पूजा सुर्वे यांचा मुंबईत सध्या जोरदार सराव सुरु आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेचा त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे. पण तिघीही वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्डकपमध्ये खेळल्या आहेत. शिवाय रशियातील एका वर्ल्डक्लास शिबिरातही तिघींनी महिनाभर सराव केला आहे. त्यामुळे कॉमनवेल्थमध्ये भारतीय टीम चांगले आव्हान उभे करेल, असे नॅशनल कोच वर्षा उपाध्येंना वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 01:04 PM IST

रिदमिक जिमनॅस्टिक्समध्ये मुंबईतील मुली

8 सप्टेंबर

कॉमनवेल्थ स्पर्धा यंदा दिल्लीत होणार आहेत. आणि घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा भारतीय ऍथलीट्सना मिळणार आहे. त्याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे, तो आपल्याकडे फारशा प्रचलित नसलेल्या खेळांना आणि त्यातील खेळाडूंना.

रिदमिक जिमनॅस्टिक्स या खेळात भारतीय टीम फक्त दुसर्‍यांदा उतरत आहे. सांघिक प्रकारात तीन मुलींची भारतीय टीम उतरणार आहे. गंमत म्हणजे या तीनही मुली मुंबईतीलच आणि एकाच कोचकडे प्रशिक्षण घेणार्‍या आहेत.

क्षिप्रा जोशी, अक्षता शेटे आणि पूजा सुर्वे यांचा मुंबईत सध्या जोरदार सराव सुरु आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेचा त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे. पण तिघीही वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्डकपमध्ये खेळल्या आहेत.

शिवाय रशियातील एका वर्ल्डक्लास शिबिरातही तिघींनी महिनाभर सराव केला आहे. त्यामुळे कॉमनवेल्थमध्ये भारतीय टीम चांगले आव्हान उभे करेल, असे नॅशनल कोच वर्षा उपाध्येंना वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close