S M L

स्फोटाचे धागेदोर : उदगीर - नाशिक - पुणे!

सुधाकर कांबळे, मुंबई8 सप्टेंबरपुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाचा मास्टरमाईंड हिमायत बेगला पुण्यातून तर शेख लालबाबा उर्फ बिलालला नाशिकमधून अटक करण्यात आली. तर यासीन उर्फ शाहरुख आणि मोहसीन चौधरी दोघे फरार आहेत...पुणे बॉम्बस्फोटाचा कट शिजला, लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये...जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बॉम्बस्फोटाबाबत हिमायत बेगच्या ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये पहिली बैठक झाली. मोहसीन चौधरी, हिमायत बेग, मोहम्मद अहमद दरार सिद्दीबाबा उर्फ यासीन उर्फ शाहरुख हे तिघे या बैठकीला हजर होते. बैठकीनंतर लगेचच 31 जानेवारीला हिमायत बेग पुण्यात आला. त्याने जर्मन बेकरीची रेकी केली. गर्दीची वेळ कोणती, कुठे आणि किती वाजता बॉम्ब ठेवायचे, याचा अंदाज त्याने घेतला...आणि तो पुन्हा उदगीरला परतला...3 फेब्रुवारीला ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्येच पुन्हा एक बैठक झाली. या बैठकीत बॉम्बस्फोटाच्या कटाला अंतिम रुप मिळाले. 7 फेब्रुवारीला मोहसीन बॉम्ब बनवण्यासाठी स्फोटके घेऊन आला. 12 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत तिथे बॉम्ब बनवण्याचे काम चालले. 13 तारखेला दुपारी हे हिमायत आणि यासीन बॉम्ब घेऊन पुण्याला आले. नियोजनाप्रमाणे यासीन जर्मन बेकरीत गेला आणि त्यानं ठरलेल्या ठिकाणी बॉम्ब ठेवले.फक्त पुणेच नाही तर नाशिकसुद्धा बॉम्बस्फोटाचे टार्गेट होते. औरंगाबाद मॉड्यूल आणि इंडियन मुजाहिद्दीन हे दोन्ही मॉड्युलएकत्र करून एक नवे मॉड्यूल या अतिरेक्यांनी तयार केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 03:54 PM IST

स्फोटाचे धागेदोर : उदगीर - नाशिक - पुणे!

सुधाकर कांबळे, मुंबई

8 सप्टेंबर

पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाचा मास्टरमाईंड हिमायत बेगला पुण्यातून तर शेख लालबाबा उर्फ बिलालला नाशिकमधून अटक करण्यात आली. तर यासीन उर्फ शाहरुख आणि मोहसीन चौधरी दोघे फरार आहेत...

पुणे बॉम्बस्फोटाचा कट शिजला, लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये...जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बॉम्बस्फोटाबाबत हिमायत बेगच्या ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये पहिली बैठक झाली. मोहसीन चौधरी, हिमायत बेग, मोहम्मद अहमद दरार सिद्दीबाबा उर्फ यासीन उर्फ शाहरुख हे तिघे या बैठकीला हजर होते. बैठकीनंतर लगेचच 31 जानेवारीला हिमायत बेग पुण्यात आला. त्याने जर्मन बेकरीची रेकी केली. गर्दीची वेळ कोणती, कुठे आणि किती वाजता बॉम्ब ठेवायचे, याचा अंदाज त्याने घेतला...आणि तो पुन्हा उदगीरला परतला...

3 फेब्रुवारीला ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्येच पुन्हा एक बैठक झाली. या बैठकीत बॉम्बस्फोटाच्या कटाला अंतिम रुप मिळाले. 7 फेब्रुवारीला मोहसीन बॉम्ब बनवण्यासाठी स्फोटके घेऊन आला. 12 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत तिथे बॉम्ब बनवण्याचे काम चालले. 13 तारखेला दुपारी हे हिमायत आणि यासीन बॉम्ब घेऊन पुण्याला आले. नियोजनाप्रमाणे यासीन जर्मन बेकरीत गेला आणि त्यानं ठरलेल्या ठिकाणी बॉम्ब ठेवले.

फक्त पुणेच नाही तर नाशिकसुद्धा बॉम्बस्फोटाचे टार्गेट होते. औरंगाबाद मॉड्यूल आणि इंडियन मुजाहिद्दीन हे दोन्ही मॉड्युलएकत्र करून एक नवे मॉड्यूल या अतिरेक्यांनी तयार केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close