S M L

पोलिसांना वाटतेय भुताची भीती

9 सप्टेंबरपोलिसांना सर्वच जण वचकून असतात. वर्दीचा असा दरारा असणार्‍या पोलिसांना मात्र, सध्या भीती वाटतेय भुताची...औरंगाबादमधील सिडको पोलीस स्टेशनचे कर्मचारी सध्या भुताच्या दहशतीखाली वावरताहेत. इथल्या एमआयडीसीतील सिडको पोलीस स्टेशनमध्ये भूत दिसत असल्याची तक्रार चक्क इथल्या पोलिसांनी केली आहे. त्याची पोलीस स्टेशनच्या डायरीत जवळपास 2 पानांची तक्रार नोंद करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस ड्युटीवर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांची भुताच्या भीती वाटते आहे. भीतीपोटी अनेक पोलीस नाईट ड्युटी करायलाही तयार होत नाहीत. भुताच्या भीतीने नाईट शिफ्टचे सगळे पोलीस कर्मचारी अंमलदारच्या खोलीत रात्र काढतात. रात्रभरात कोणत्याही कामासाठी एकटे जाण्यास कोणी तयार होत नाहीत. कर्मचार्‍यांना साधे पाणी जरी प्यायचे असले, तरी कुणाला सोबत घेऊन जातात. भुताच्या भीतीने पछाडलेल्या काही कर्मचार्‍यांनी वरिष्ठांकडे बदलीची मागणी केली आहे. भुताच्या या दहशतीबद्दल कॅमेर्‍यासमोर मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 10:52 AM IST

पोलिसांना वाटतेय भुताची भीती

9 सप्टेंबर

पोलिसांना सर्वच जण वचकून असतात. वर्दीचा असा दरारा असणार्‍या पोलिसांना मात्र, सध्या भीती वाटतेय भुताची...औरंगाबादमधील सिडको पोलीस स्टेशनचे कर्मचारी सध्या भुताच्या दहशतीखाली वावरताहेत.

इथल्या एमआयडीसीतील सिडको पोलीस स्टेशनमध्ये भूत दिसत असल्याची तक्रार चक्क इथल्या पोलिसांनी केली आहे. त्याची पोलीस स्टेशनच्या डायरीत जवळपास 2 पानांची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळेस ड्युटीवर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांची भुताच्या भीती वाटते आहे. भीतीपोटी अनेक पोलीस नाईट ड्युटी करायलाही तयार होत नाहीत. भुताच्या भीतीने नाईट शिफ्टचे सगळे पोलीस कर्मचारी अंमलदारच्या खोलीत रात्र काढतात.

रात्रभरात कोणत्याही कामासाठी एकटे जाण्यास कोणी तयार होत नाहीत. कर्मचार्‍यांना साधे पाणी जरी प्यायचे असले, तरी कुणाला सोबत घेऊन जातात.

भुताच्या भीतीने पछाडलेल्या काही कर्मचार्‍यांनी वरिष्ठांकडे बदलीची मागणी केली आहे. भुताच्या या दहशतीबद्दल कॅमेर्‍यासमोर मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close