S M L

नागपुरात बस धुवा आंदोलन

9 सप्टेंबरकेंद्र सरकारच्या जएनयूआरएम अंतर्गत नागपूर शहरात वाहतुकीसाठी अडीचशे बस महापालिकेला दिल्या आहेत. पण गेल्या 2 वर्षांपासून यापैकी काही बस अडगळीत पडून आहेत. त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीही होत नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. तर रस्त्यांवर धावणार्‍या अनेक बसही खराब झाल्या आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील अनेक बस पाण्याने धुतल्या. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 11:04 AM IST

नागपुरात बस धुवा आंदोलन

9 सप्टेंबर

केंद्र सरकारच्या जएनयूआरएम अंतर्गत नागपूर शहरात वाहतुकीसाठी अडीचशे बस महापालिकेला दिल्या आहेत. पण गेल्या 2 वर्षांपासून यापैकी काही बस अडगळीत पडून आहेत.

त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीही होत नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. तर रस्त्यांवर धावणार्‍या अनेक बसही खराब झाल्या आहेत.

शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील अनेक बस पाण्याने धुतल्या.

महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close