S M L

मौल्यवान खड्यांचे गणपती...

9 सप्टेंबररोहिणी गोसावी, मुंबई गणपतीच्या मूर्तीवरील दागिने हा तसा नेमहमीच चर्चेचा विषय. पण जर मौल्यवान मानल्या जाणार्‍या खड्यांवरच गणपती बाप्पा विराजमान झाले तर... हे कॉम्बिनेशन जरा वेगळे आहे. रोझ क्वार्टझ, हाऊलाईट, ब्लु कॉल्सिडनी हे सगळे मौल्यवान खडे आपल्या आयुष्यात शांतता आणि समाधान आणतात, या विश्वासाने अनेकजण वापरतात. पण आता या मौल्यवान रत्नांपासून वेगवेगळ्या गणेशमुर्ती बनवण्यात आल्या आहेत.या मूर्ती एकसंध अशा मौल्यवान दगडात कोरल्या गेल्यात, यातल्या प्रत्येक मूर्तीचे आणि रत्नाचे वेगळे महत्व आहे. दीडशे रुपयांपासून ते सहा लाखांपर्यंतच्या मूर्ती इथे मिळतात. यामूर्तीचे सौंदर्य पाहून त्या गिफ्ट म्हणून देण्यासही उपयुक्त असल्याचे ग्राहकांना वाटते.या मूर्तीच्या निमित्ताने गणपती बाप्पा तुमच्या घरात कायमचे विराजमान होऊ शकतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 11:14 AM IST

मौल्यवान खड्यांचे गणपती...

9 सप्टेंबर

रोहिणी गोसावी, मुंबई

गणपतीच्या मूर्तीवरील दागिने हा तसा नेमहमीच चर्चेचा विषय. पण जर मौल्यवान मानल्या जाणार्‍या खड्यांवरच गणपती बाप्पा विराजमान झाले तर... हे कॉम्बिनेशन जरा वेगळे आहे.

रोझ क्वार्टझ, हाऊलाईट, ब्लु कॉल्सिडनी हे सगळे मौल्यवान खडे आपल्या आयुष्यात शांतता आणि समाधान आणतात, या विश्वासाने अनेकजण वापरतात.

पण आता या मौल्यवान रत्नांपासून वेगवेगळ्या गणेशमुर्ती बनवण्यात आल्या आहेत.या मूर्ती एकसंध अशा मौल्यवान दगडात कोरल्या गेल्यात, यातल्या प्रत्येक मूर्तीचे आणि रत्नाचे वेगळे महत्व आहे.

दीडशे रुपयांपासून ते सहा लाखांपर्यंतच्या मूर्ती इथे मिळतात. यामूर्तीचे सौंदर्य पाहून त्या गिफ्ट म्हणून देण्यासही उपयुक्त असल्याचे ग्राहकांना वाटते.

या मूर्तीच्या निमित्ताने गणपती बाप्पा तुमच्या घरात कायमचे विराजमान होऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close