S M L

सांगलीत चोर गणपती विराजमान

10 सप्टेंबरराज्यात गणेश चतुर्थीला गणरायाचेआगमन होते. पण सांगलीत मात्र दोन दिवस अगोदरच गणपती बाप्पाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीत गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची ही मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जाते. हा गणपती दीड दिवसाचा असतो. याचे विसर्जन केले जात नाही. त्याला सुरक्षित ठिकाणी ठेऊन, त्याचे जतन केले जाते. या गणपतीसोबतच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापनाही होते. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीचं पूजन केले जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यांतील शेकडो भाविक येतात. हा सोहळा पाच दिवसांचा असतो. पाचव्या दिवशी मिरवणुकीने या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 12:25 PM IST

सांगलीत चोर गणपती विराजमान

10 सप्टेंबर

राज्यात गणेश चतुर्थीला गणरायाचेआगमन होते. पण सांगलीत मात्र दोन दिवस अगोदरच गणपती बाप्पाची स्थापना होते.

या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीत गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची ही मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जाते.

हा गणपती दीड दिवसाचा असतो. याचे विसर्जन केले जात नाही. त्याला सुरक्षित ठिकाणी ठेऊन, त्याचे जतन केले जाते. या गणपतीसोबतच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापनाही होते.

राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीचं पूजन केले जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यांतील शेकडो भाविक येतात.

हा सोहळा पाच दिवसांचा असतो. पाचव्या दिवशी मिरवणुकीने या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close