S M L

खड्‌ड्यांमुळे बाप्पांच्या वाटेत विघ्न

13 सप्टेंबरमुंबईतील खड्‌ड्यांमुळे गणपती बाप्पांच्या मार्गात विघ्न निर्माण झाले आहे. बाप्पांच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवण्याचे महापालिकेचे आश्वासन होते. पण खड्डे तसेच राहिल्याने गणेशोत्सव समन्वय समितीने कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आता सगळीकडूनच महापालिकेवर टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करत आता गणेश विसर्जनापूर्वी रस्ते दुरूस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आल्याने कोर्टात जाणार नसल्याचे समन्वय समितीने सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:03 AM IST

खड्‌ड्यांमुळे बाप्पांच्या वाटेत विघ्न

13 सप्टेंबर

मुंबईतील खड्‌ड्यांमुळे गणपती बाप्पांच्या मार्गात विघ्न निर्माण झाले आहे. बाप्पांच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवण्याचे महापालिकेचे आश्वासन होते.

पण खड्डे तसेच राहिल्याने गणेशोत्सव समन्वय समितीने कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आता सगळीकडूनच महापालिकेवर टीका होऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करत आता गणेश विसर्जनापूर्वी रस्ते दुरूस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

त्याअंतर्गत काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आल्याने कोर्टात जाणार नसल्याचे समन्वय समितीने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close