S M L

सांगलीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गणपती

आसिफ मुरसल, सांगली13 सप्टेंबर35 वर्षांपूर्वी सांगलीला खूप मोठ्या पावसाने झोडपले. गणेेशोत्सव तर तोंडावर आलेला...पण मूर्ती बसवायची कुठे, मांडव घालायचा कुठे... असा प्रश्न गोटखिंडीच्या गावकर्‍यांना पडला...आणि तो तात्काळ सुटलाही... आणि त्यातूनच साकारला ऐक्याचा गणपती...निसर्गाच्या कुशीत लपलेले गोटखिंड सांगलीतील आष्टा तालुक्यात आहे. येथील मशिदीत गणपतीबाप्पा बसवला गेला आहे. गेल्या 35 वर्षांपासून या मशिदीत गणपतीबाप्पा विराजमान होतात.हिंदू आणि मुस्लिम समाज मिळून मोठ्या जल्लोषात या मशिदीत बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. न्यू गणेश झुंजार तरुण मंडळाच्या वतीने याची स्थापना होते. मुस्लिम समाज मनोभावे गणेशाची पूजा करतो. आणि पुढचे 10 दिवस रंगतो ऐक्याचा सोहळा...मिरजेच्या पर्यायाने सांगलीच्या इतिहासाला मागील वर्षी जातीय दंगलीचा काळाकुट्ट डाग लागला. पण गोटखिंडीच्या या ऐक्य पंरपरेवर त्याचा तसूभरही परिणाम झालेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:45 AM IST

सांगलीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गणपती

आसिफ मुरसल, सांगली13 सप्टेंबर

35 वर्षांपूर्वी सांगलीला खूप मोठ्या पावसाने झोडपले. गणेेशोत्सव तर तोंडावर आलेला...पण मूर्ती बसवायची कुठे, मांडव घालायचा कुठे... असा प्रश्न गोटखिंडीच्या गावकर्‍यांना पडला...आणि तो तात्काळ सुटलाही... आणि त्यातूनच साकारला ऐक्याचा गणपती...

निसर्गाच्या कुशीत लपलेले गोटखिंड सांगलीतील आष्टा तालुक्यात आहे. येथील मशिदीत गणपतीबाप्पा बसवला गेला आहे.

गेल्या 35 वर्षांपासून या मशिदीत गणपतीबाप्पा विराजमान होतात.हिंदू आणि मुस्लिम समाज मिळून मोठ्या जल्लोषात या मशिदीत बाप्पाची प्रतिष्ठापना करतात.

न्यू गणेश झुंजार तरुण मंडळाच्या वतीने याची स्थापना होते. मुस्लिम समाज मनोभावे गणेशाची पूजा करतो. आणि पुढचे 10 दिवस रंगतो ऐक्याचा सोहळा...

मिरजेच्या पर्यायाने सांगलीच्या इतिहासाला मागील वर्षी जातीय दंगलीचा काळाकुट्ट डाग लागला. पण गोटखिंडीच्या या ऐक्य पंरपरेवर त्याचा तसूभरही परिणाम झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close