S M L

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसात 7 मृत्यूमुखी

13 सप्टेंबरजम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचारात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 2 जण बांदिपोरा आणि चरारे शरीफ इथे ठार झाले आहेत. तर 5 जण बडगाम आणि तनमार्ग इथे ठार झाले आहेत. आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या संघर्षात 25 वर्षांच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. काही भागात कर्फ्यू कायम आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत सुरक्षेसंदर्भातील कॅबिनेट कमिटीची बैठक होणार आहे. त्यात काश्मीरमधील सुरक्षा दलांचा विशेष अधिकार काही प्रमाणात काढून घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. पण या बैठकीत कोणताच निर्णय होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, खोर्‍यातील वाढत्या हिसांचाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनीही तातडीची मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होत आहे. तत्पूर्वी अब्दुल्ला यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. सशस्त्र दलांचा विशेषाधिकार काही प्रमाणात काढल्याने खोर्‍यात विश्वास दृढ करण्याच्या प्रक्रियेला बळ मिळेल, असे ते म्हणाले. गृहमंत्रालयाची या निर्णयाला हरकत नाही. पण संरक्षण मंत्रालयाचा मात्र त्याला पाठिंबा नाही. भाजपनेही या निर्णयाला विरोध केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 12:15 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसात 7 मृत्यूमुखी

13 सप्टेंबर

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचारात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 2 जण बांदिपोरा आणि चरारे शरीफ इथे ठार झाले आहेत.

तर 5 जण बडगाम आणि तनमार्ग इथे ठार झाले आहेत. आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या संघर्षात 25 वर्षांच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. काही भागात कर्फ्यू कायम आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत सुरक्षेसंदर्भातील कॅबिनेट कमिटीची बैठक होणार आहे. त्यात काश्मीरमधील सुरक्षा दलांचा विशेष अधिकार काही प्रमाणात काढून घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.

पण या बैठकीत कोणताच निर्णय होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, खोर्‍यातील वाढत्या हिसांचाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनीही तातडीची मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे.

थोड्याच वेळात ही बैठक सुरू होत आहे. तत्पूर्वी अब्दुल्ला यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली.

सशस्त्र दलांचा विशेषाधिकार काही प्रमाणात काढल्याने खोर्‍यात विश्वास दृढ करण्याच्या प्रक्रियेला बळ मिळेल, असे ते म्हणाले. गृहमंत्रालयाची या निर्णयाला हरकत नाही.

पण संरक्षण मंत्रालयाचा मात्र त्याला पाठिंबा नाही. भाजपनेही या निर्णयाला विरोध केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close