S M L

मनसे कार्यकर्त्यांचा नागपुरात राडा

13 सप्टेंबरशहरातील अस्वच्छता आणि रस्त्यावरील खड्डयांचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी आज नागपूर महापालिकेत राडा केला. त्यांनी महापालिकेचे उपअभियंता कृष्णकुमार हेडावू यांच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली. तसेच या कार्यकर्त्यांनी कृष्णकुमार यांनी सडलेला भाजीपालाही भेट दिला. नागपूरच्या नंदनवन झोपडपट्टी भागात सर्वत्र घाण पसरली आहे. गटारे उघड्यावर आहेत. तर पावसामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. वारंवार महापालिकेला विनंती करुनही पालिकेने याची दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 04:33 PM IST

मनसे कार्यकर्त्यांचा नागपुरात राडा

13 सप्टेंबर

शहरातील अस्वच्छता आणि रस्त्यावरील खड्डयांचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी आज नागपूर महापालिकेत राडा केला.

त्यांनी महापालिकेचे उपअभियंता कृष्णकुमार हेडावू यांच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली. तसेच या कार्यकर्त्यांनी कृष्णकुमार यांनी सडलेला भाजीपालाही भेट दिला.

नागपूरच्या नंदनवन झोपडपट्टी भागात सर्वत्र घाण पसरली आहे. गटारे उघड्यावर आहेत. तर पावसामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत.

वारंवार महापालिकेला विनंती करुनही पालिकेने याची दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close