S M L

मैदाने वाचवण्यासाठी महापालिकेचे नवे धोरण

14 सप्टेंबरमुंबईत सध्या मोजकीच मैदाने उरली आहेत. ही उरलेली मैदाने वाचवण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. यासाठी पालिका नवे धोरण तयार करणार आहे. यात नागरिकांचा सक्रीय सहभाग असेल. आपल्या परिसरात किती मोकळी जागा असावी, हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीतील नागरिकांना मिळणार आहे. मैदान जर बिल्डरला देण्याचा घाट घातला जात असेल आणि नागरिकांचा विरोध असेल, तर तो प्रस्ताव रद्द होईल, अशीही तरतूद या नव्या धोरणात राहणार आहे. मुंबईतील अनेक मैदाने ही खासगी विकासकांना दिल्यानंतर त्यांचा वापर त्यांनी सार्वजनिक कामांसाठी न करता खासगी कामासाठी केला. या सगळ्या गैरव्यवहाराला आता या नव्या धोरणामुळे चाप बसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 01:37 PM IST

मैदाने वाचवण्यासाठी महापालिकेचे नवे धोरण

14 सप्टेंबर

मुंबईत सध्या मोजकीच मैदाने उरली आहेत. ही उरलेली मैदाने वाचवण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. यासाठी पालिका नवे धोरण तयार करणार आहे.

यात नागरिकांचा सक्रीय सहभाग असेल. आपल्या परिसरात किती मोकळी जागा असावी, हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीतील नागरिकांना मिळणार आहे.

मैदान जर बिल्डरला देण्याचा घाट घातला जात असेल आणि नागरिकांचा विरोध असेल, तर तो प्रस्ताव रद्द होईल, अशीही तरतूद या नव्या धोरणात राहणार आहे.

मुंबईतील अनेक मैदाने ही खासगी विकासकांना दिल्यानंतर त्यांचा वापर त्यांनी सार्वजनिक कामांसाठी न करता खासगी कामासाठी केला.

या सगळ्या गैरव्यवहाराला आता या नव्या धोरणामुळे चाप बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close