S M L

गडचिरोलीत आरोग्य स्वावलंबन

प्रशांत कोरटकर, कुरखेडा, गडचिरोली14 सप्टेंबर'आपले आरोग्य आपल्या हाती' हे ब्रीदवाक्य घेऊन गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या संस्थेचे काम सुरू झाले. त्यामुळे गेली 25 वर्ष आदिवासी स्वत:च आपल्या आरोग्याच्या प्रश्नांवर तोडगा शोधत आहेत. गडचिरोलीपासून 40 किलोमीटरवर अंतरावर असलेले कुरखेडा हे आदिवासी गाव. 1984 साली या गावातून आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे काम सुरू झाले आणि या कुरखेडाला वेगळी ओळख मिळाली. संस्थेने आदिवासींच्या पारंपारिक औषधांवरच काम करायला सुरुवात केली. पारंपारिक ज्ञानाचा आणि शास्त्राचा वापर करत वनौषधी तयार केल्या जाऊ लागल्या. गडचिरोली आणि चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते या कामात जोडले गेले. दारुबंदीसोबतच सरकारी आरोग्य यंत्रणा कशा सक्षम होतील यासाठी गावकर्‍यांनाच संघटीत केले जाऊ लागले. कुरखेड्यापासून सुरु झालेले आरोग्याचे व्रत आज 200 गावांपर्यंत पोहचले आहे. आणि बचतगटांमार्फत 600 महिलांपर्यंत. फक्त उपचार नव्हे तर आरोग्यव्यवस्था उभी करण्यासाठी लोकांचा सहभाग यावर संस्थेचा भर आहे. हे स्वावलंबन येण्यासाठी या आरोग्यदूतांना मदतीचे हात हवे आहेत.आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेला मदत तुम्ही करु शकता. ही मदत आर्थिक किंवा कार्यकर्ते, डॉक्टर, आरोग्यसेवक म्हणून संस्थेच्या कामात तुम्ही सहभागी होऊ शकता.त्यासाठी पत्ता आहे - पत्ता :आम्ही आमच्या आरोग्यासाठीमु.पो.ता. कुरखेडागडचिरोली पिन कोड : 4412209 मोबाईल नं : 9421006699

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 03:45 PM IST

गडचिरोलीत आरोग्य स्वावलंबन

प्रशांत कोरटकर, कुरखेडा, गडचिरोली

14 सप्टेंबर

'आपले आरोग्य आपल्या हाती' हे ब्रीदवाक्य घेऊन गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या संस्थेचे काम सुरू झाले. त्यामुळे गेली 25 वर्ष आदिवासी स्वत:च आपल्या आरोग्याच्या प्रश्नांवर तोडगा शोधत आहेत.

गडचिरोलीपासून 40 किलोमीटरवर अंतरावर असलेले कुरखेडा हे आदिवासी गाव. 1984 साली या गावातून आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे काम सुरू झाले आणि या कुरखेडाला वेगळी ओळख मिळाली.

संस्थेने आदिवासींच्या पारंपारिक औषधांवरच काम करायला सुरुवात केली. पारंपारिक ज्ञानाचा आणि शास्त्राचा वापर करत वनौषधी तयार केल्या जाऊ लागल्या. गडचिरोली आणि चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते या कामात जोडले गेले.

दारुबंदीसोबतच सरकारी आरोग्य यंत्रणा कशा सक्षम होतील यासाठी गावकर्‍यांनाच संघटीत केले जाऊ लागले. कुरखेड्यापासून सुरु झालेले आरोग्याचे व्रत आज 200 गावांपर्यंत पोहचले आहे. आणि बचतगटांमार्फत 600 महिलांपर्यंत.

फक्त उपचार नव्हे तर आरोग्यव्यवस्था उभी करण्यासाठी लोकांचा सहभाग यावर संस्थेचा भर आहे. हे स्वावलंबन येण्यासाठी या आरोग्यदूतांना मदतीचे हात हवे आहेत.

आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेला मदत तुम्ही करु शकता. ही मदत आर्थिक किंवा कार्यकर्ते, डॉक्टर, आरोग्यसेवक म्हणून संस्थेच्या कामात तुम्ही सहभागी होऊ शकता.

त्यासाठी पत्ता आहे -

पत्ता :आम्ही आमच्या आरोग्यासाठीमु.पो.ता. कुरखेडागडचिरोली पिन कोड : 4412209 मोबाईल नं : 9421006699

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close