S M L

राफेलने ग्रँडस्लॅम जिंकले

14 सप्टेंबरटेनिसपटू राफेल नदालने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम जिंकून करिअर स्लॅम मिळवले आहेत. म्हणजे चारही ग्रँडस्लॅम आणि त्यासोबतच ऑलिम्पिक गोल्ड मेडल पटकावण्याची किमया त्याने केली आहे.सोमवारी अमेरिकन ओपन स्पर्धेत पुरुषांची फायनल सुरु होती तेव्हा जमलेल्या प्रेक्षकांनाही ही मॅच नेहमी सारखी नाही याची कल्पना होती...खासकरुन नदालला मॅच पॉइंट मिळाला तेव्हा तर त्यांची उत्कंठाही शिगेला पोहोचली. अखेर नदालची ही सर्व्हिस योकोविचला परतवता आली नाही. आणि तो ऐतिहासिक क्षण आला. 24 वर्षांच्या नदालने ही फायनल मॅच 6-4, 5-7, 6-4 आणि 6-3ने जिंकली. अमेरिकन ओपनमधलं त्याचं हे पहिलं पण एकूण नववं ग्रँडस्लॅम विजेतेपद. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या विजयामुळे त्याने करिअर स्लॅम पूर्ण केला. नदालचे आव्हान यावर्षी सगळ्यांनाच भारी पडले आहे. आणि नोवान योकोविचला तर सोमवारी ते झेपलेच नाही. मॅचच्या शेवटच्या गेममध्ये 30-30 अशी बरोबरी होती. पण निर्णायक क्षणी जो खेळ उंचावतो त्यालाच चॅम्पियन म्हणतात. नदालचाही आपल्या खेळावर ताबा होता. आणि बरोबरीची कोंडी त्याने फोडली ती आपल्या बाजूने. नोवान योकोविचने दुसरा सेट तर जिंकला. पण त्यानंतर महत्त्वाच्या क्षणी त्याच्याकडून चुका झाल्या. किंवा नदालने त्याला चुका करायला भाग पाडले. तिसरा सेट जिंकून नदालने मॅचवर वर्चस्व मिळवले. आणि निर्णायक सेटमध्येही दमदार सर्व्हिसच्या मदतीने मॅच जिंकली. आधी ही भन्नाट एस आणि नंतर परतवायला अशक्य अशी ही सर्व्हिस...योकोविचने तेव्हाच हार पत्करली. नदालचे या वर्षातील हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद. आणि करिअर स्लॅम पूर्ण करणारा तर तो वयाने सगळ्यात लहान टेनिसपटू ठरला आहे.किम क्लाइस्टर्सची कमालराफेल नदालसाठी ही अमेरिकन ओपन स्पर्धा ऐतिहासिक ठरली. तर महिलांमध्ये किम क्लाइस्टर्ससाठी ही स्पर्धा नवा आत्मविश्वास मिळवून देणारी ठरली. सततच्या दुखापतींमुळे 2007 मध्ये तिने टेनिसला रामराम ठोकला होता. पण 2009 मध्ये कमबॅक केल्यापासून ही स्पर्धा तिने सलग दुसर्‍यांदा जिंकली. तेही एका मुलीची आई असताना. या वर्षीची अमेरिकन ओपन ट्रॉफी स्विकारली तेव्हा तिचा नवरा बास्केटबॉलपटू ब्रायन लिंच आणि अडीच वर्षांची मुलगी यादा एली हजर होते. क्लाइस्टर्सने ट्रॉफी स्विकारली तीही यादाला कडेवर घेऊनच.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 04:40 PM IST

राफेलने ग्रँडस्लॅम जिंकले

14 सप्टेंबर

टेनिसपटू राफेल नदालने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम जिंकून करिअर स्लॅम मिळवले आहेत. म्हणजे चारही ग्रँडस्लॅम आणि त्यासोबतच ऑलिम्पिक गोल्ड मेडल पटकावण्याची किमया त्याने केली आहे.

सोमवारी अमेरिकन ओपन स्पर्धेत पुरुषांची फायनल सुरु होती तेव्हा जमलेल्या प्रेक्षकांनाही ही मॅच नेहमी सारखी नाही याची कल्पना होती...खासकरुन नदालला मॅच पॉइंट मिळाला तेव्हा तर त्यांची उत्कंठाही शिगेला पोहोचली. अखेर नदालची ही सर्व्हिस योकोविचला परतवता आली नाही. आणि तो ऐतिहासिक क्षण आला.

24 वर्षांच्या नदालने ही फायनल मॅच 6-4, 5-7, 6-4 आणि 6-3ने जिंकली. अमेरिकन ओपनमधलं त्याचं हे पहिलं पण एकूण नववं ग्रँडस्लॅम विजेतेपद. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या विजयामुळे त्याने करिअर स्लॅम पूर्ण केला.

नदालचे आव्हान यावर्षी सगळ्यांनाच भारी पडले आहे. आणि नोवान योकोविचला तर सोमवारी ते झेपलेच नाही. मॅचच्या शेवटच्या गेममध्ये 30-30 अशी बरोबरी होती. पण निर्णायक क्षणी जो खेळ उंचावतो त्यालाच चॅम्पियन म्हणतात. नदालचाही आपल्या खेळावर ताबा होता. आणि बरोबरीची कोंडी त्याने फोडली ती आपल्या बाजूने.

नोवान योकोविचने दुसरा सेट तर जिंकला. पण त्यानंतर महत्त्वाच्या क्षणी त्याच्याकडून चुका झाल्या. किंवा नदालने त्याला चुका करायला भाग पाडले. तिसरा सेट जिंकून नदालने मॅचवर वर्चस्व मिळवले. आणि निर्णायक सेटमध्येही दमदार सर्व्हिसच्या मदतीने मॅच जिंकली.

आधी ही भन्नाट एस आणि नंतर परतवायला अशक्य अशी ही सर्व्हिस...योकोविचने तेव्हाच हार पत्करली. नदालचे या वर्षातील हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद. आणि करिअर स्लॅम पूर्ण करणारा तर तो वयाने सगळ्यात लहान टेनिसपटू ठरला आहे.

किम क्लाइस्टर्सची कमाल

राफेल नदालसाठी ही अमेरिकन ओपन स्पर्धा ऐतिहासिक ठरली. तर महिलांमध्ये किम क्लाइस्टर्ससाठी ही स्पर्धा नवा आत्मविश्वास मिळवून देणारी ठरली. सततच्या दुखापतींमुळे 2007 मध्ये तिने टेनिसला रामराम ठोकला होता.

पण 2009 मध्ये कमबॅक केल्यापासून ही स्पर्धा तिने सलग दुसर्‍यांदा जिंकली. तेही एका मुलीची आई असताना. या वर्षीची अमेरिकन ओपन ट्रॉफी स्विकारली तेव्हा तिचा नवरा बास्केटबॉलपटू ब्रायन लिंच आणि अडीच वर्षांची मुलगी यादा एली हजर होते. क्लाइस्टर्सने ट्रॉफी स्विकारली तीही यादाला कडेवर घेऊनच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close