S M L

काश्मीरबाबत चर्चेचे आवाहन

15 सप्टेंबरकाश्मिरमधील तरुणांनी हिंसा सोडून सामोपचाराने चर्चेचे धोरण स्वीकारावे, असे आवाहन आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे.काश्मीरच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. फक्त शांतता हाच काश्मीर समस्येवरील उपाय असल्याचे पंतप्रधान या बैठकीत म्हणाले. काश्मीरमधील काही भागात, लष्कराचे अधिकार कमी करण्याबाबत आज चर्चा होणार आहे. काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करणे, फुटीरवाद्यांशी चर्चा, शीख आणि काश्मीरी पंडीतांसाठी अल्पसंख्यांक आयोग स्थापन करणे यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. पण भाजपने मात्र ओमर अब्दुलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पीडीपीच्या वतीने मेहेमुबा मुफ्ती या बैठकीत सहभागी झाल्यात. या आधी झालेल्या बैठकीत पीडीपीने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला होता. आजच्या बैठकीत पीडीपी काय भूमिका घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जम्मू आणि काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक चर्चेतले मुद्दे - लष्कराचे विशेषाधिकार हटवण्याबाबत चर्चा हिंसाचार थांबवण्याबाबत उपायहुर्रियत सोबत चर्चा करावी कायकाश्मिरसाठी विशेष पॅकेजकाश्मीरी पंडीत आणि शिखांच्या परतीसाठी योजना (मायनॉरीटी आयोग) शरण आलेल्या अतिरेक्यांच्या पुनर्वसनाबाबात चर्चा

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 08:23 AM IST

काश्मीरबाबत चर्चेचे आवाहन

15 सप्टेंबर

काश्मिरमधील तरुणांनी हिंसा सोडून सामोपचाराने चर्चेचे धोरण स्वीकारावे, असे आवाहन आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे.

काश्मीरच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. फक्त शांतता हाच काश्मीर समस्येवरील उपाय असल्याचे पंतप्रधान या बैठकीत म्हणाले.

काश्मीरमधील काही भागात, लष्कराचे अधिकार कमी करण्याबाबत आज चर्चा होणार आहे. काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करणे, फुटीरवाद्यांशी चर्चा, शीख आणि काश्मीरी पंडीतांसाठी अल्पसंख्यांक आयोग स्थापन करणे यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. पण भाजपने मात्र ओमर अब्दुलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पीडीपीच्या वतीने मेहेमुबा मुफ्ती या बैठकीत सहभागी झाल्यात. या आधी झालेल्या बैठकीत पीडीपीने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला होता. आजच्या बैठकीत पीडीपी काय भूमिका घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जम्मू आणि काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक चर्चेतले मुद्दे -

लष्कराचे विशेषाधिकार हटवण्याबाबत चर्चा

हिंसाचार थांबवण्याबाबत उपाय

हुर्रियत सोबत चर्चा करावी काय

काश्मिरसाठी विशेष पॅकेज

काश्मीरी पंडीत आणि शिखांच्या परतीसाठी योजना (मायनॉरीटी आयोग)

शरण आलेल्या अतिरेक्यांच्या पुनर्वसनाबाबात चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 08:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close