S M L

ललित मोदींना कोर्टाने पुन्हा फटकारले

15 सप्टेंबरललित मोदींना हाय कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले आहे. मोदींची चौकशी करण्यासाठी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने एक त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.त्यात चिरायू अमीन, अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांची त्यात वर्णी लागली होती. पण या चौकशी समितीतून अमीन आणि जेटलींना हलवण्याची मागणी मोदींनी याअगोदर केली होती.पण बीसीसीआयने ही मागणी नाकारली होती. त्यामुळे मोदींनी याविरोधात हाय कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. पण आज कोर्टाने ही याचिका फेटाळून मोदींना पुन्हा एक चपराक दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 08:37 AM IST

ललित मोदींना कोर्टाने पुन्हा फटकारले

15 सप्टेंबर

ललित मोदींना हाय कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले आहे. मोदींची चौकशी करण्यासाठी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने एक त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.

त्यात चिरायू अमीन, अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांची त्यात वर्णी लागली होती. पण या चौकशी समितीतून अमीन आणि जेटलींना हलवण्याची मागणी मोदींनी याअगोदर केली होती.

पण बीसीसीआयने ही मागणी नाकारली होती. त्यामुळे मोदींनी याविरोधात हाय कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. पण आज कोर्टाने ही याचिका फेटाळून मोदींना पुन्हा एक चपराक दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close