S M L

नाशिक क्रिकेट संघटनांच्या वादात बळी जातोय अव्वल क्रिकेटपटूंचा

रणजी क्रिकेट स्पर्धेतले सामने यंदा नाशिकमध्ये होत आहेत. नेमक्या त्याचवेळी दोन संघटनांच्या वादात शहरातल्या अव्वल क्रिकेटपटूंचा बळी जातोय. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनआणि नाशिक क्रिडा अकादमीच्या अतंर्गत वादामुळे इथल्या क्रिकेटर्सवर बंदी घालण्यात आली आहे. या खेळाडूंनी गैरवर्तन केल्याचा ठपका नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशननं ठेवलाय. त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचा कॅप्टन अमित पाटीलच्या मते, तीन वर्षांची बंदी म्हणजे मोठा सेट बॅक आहे. क्रिकेटमध्ये एक एक क्षण महत्त्वाचा असतो. तीन वर्षांचा कालावधी खूप आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा कम बॅक कठीण आहे. दुसरीकडे, असोसिएशन हे मुद्दाम करत असल्याचं आरोप नाशिक क्रिकेट अकादमीनं केला आहे. नाशिक क्रिकेट अकादमीचे सेक्रेटरी- मकरंद ओक सांगतात, त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून आमच्या संघाला पुढच्या स्पर्धांपासून वंचित ठेवलंय. संघटनांचं भांडण सुरू आहे. पण खेळाडूंची प्रॅक्टिसही सुरू आहेच. खेळायला मिळेल की नाही याची भीती आहे. तरीही लोकांच्या आवडत्या क्रिकेटमध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी आशाही आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2008 04:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2008 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close