S M L

पुण्यातील ट्रॅफिकची माहिती इंटरनेटवर

15 सप्टेंबरपुण्यातील ट्रॅफिक जामला वैतागलेल्या पुणेकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. एका क्लिकवर इंटरनेटच्या माध्यमातून कोणकोणत्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे, त्याचबरोबर या वाहतूक कोंडीचे कारण काय? तसेच कुठल्या पर्यायी रस्त्याने अपेक्षित ठिकाणी पोचता येईल, ही सर्व उपयुक्त माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान ही वेबसाईट सुरू झाली असून गणपती विसर्जनाच्या वेळी कोणते रस्ते वाहतूकीसाठी खुले आहेत बंद आहेत हेसुध्दा यातून समजणार आहे. काही काळानंतर मोबाईलवरदेखील पुण्याच्या ट्रॅफिकची सर्व माहिती मिळणार आहे.या वेबसाईटसाठी कानपूर आयआयटीच्या दोन इंजीनिअर्सची मदत घेण्यात आली आहे. पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रात्यक्षिक दाखवून या अभिनव उपक्रमाची माहिती पत्रकारांना दिली. www.punepolice.gov.in या वेबसाईटवर आपल्याला ही माहिती मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 08:54 AM IST

पुण्यातील ट्रॅफिकची माहिती इंटरनेटवर

15 सप्टेंबर

पुण्यातील ट्रॅफिक जामला वैतागलेल्या पुणेकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. एका क्लिकवर इंटरनेटच्या माध्यमातून कोणकोणत्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे, त्याचबरोबर या वाहतूक कोंडीचे कारण काय? तसेच कुठल्या पर्यायी रस्त्याने अपेक्षित ठिकाणी पोचता येईल, ही सर्व उपयुक्त माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान ही वेबसाईट सुरू झाली असून गणपती विसर्जनाच्या वेळी कोणते रस्ते वाहतूकीसाठी खुले आहेत बंद आहेत हेसुध्दा यातून समजणार आहे. काही काळानंतर मोबाईलवरदेखील पुण्याच्या ट्रॅफिकची सर्व माहिती मिळणार आहे.

या वेबसाईटसाठी कानपूर आयआयटीच्या दोन इंजीनिअर्सची मदत घेण्यात आली आहे. पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रात्यक्षिक दाखवून या अभिनव उपक्रमाची माहिती पत्रकारांना दिली. www.punepolice.gov.in या वेबसाईटवर आपल्याला ही माहिती मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close