S M L

तेलगळतीमुळे किनार्‍याचे मोठे नुकसान

15 सप्टेंबरजेएनपीटीजवळ झालेल्या दोन जहाजांच्या टकरीमुळे संपूर्ण अलिबाग किनारपट्टीचे आणि कुलाबा किनार्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाळूमध्ये झिरपलेल्या तेलाच्या प्रमाणाचे आकडे 'टेरी'ने जाहीर केलेयत. आणि ते धक्कादायक आहेत.टेरी म्हणजेच द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात हे गंभीर परिणाम समोर आले आहेत. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोलियम हायड्रोकार्बन या किनार्‍यांवर साचले असल्याचे टेरीचे म्हणणे आहे. हे प्रदूषण विशेषत: कुलाबा आणि अलिबाग समुद्र किनारा या दोन ठिकाणी आढळून आलंय. आंतरराष्ट्रीय नियमानुसार 1 किलो वाळूमध्ये हजार मिलीग्रॅमपेक्षा जास्त तेल असेल तर ते तेल स्वच्छ करण्याची गरज आहे. तसेच नियमानुसार प्रदूषण करणार्‍याने यासाठी दंड भरला पाहिजे. युरोप, मध्य पूर्वेतील देश आणि अमेरिकेमध्ये या नियमाचे पालन केले जाते. भारतामध्ये मात्र अशी कुठलीही मर्यादा घालून दिलेली नाही. अलिबागच्या समुद्रकिनार्‍यावर 1 किलो वाळूमागे 60 हजार मिलीग्रॅम म्हणजेच 60 पट जास्त प्रदूषण झालं आहे. तर कुलाब्याजवळ ठरवून दिलेल्या आंतरराष्ट्रीय मर्यादेपेक्षा 381 पट प्रदूषण झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 09:22 AM IST

तेलगळतीमुळे किनार्‍याचे मोठे नुकसान

15 सप्टेंबर

जेएनपीटीजवळ झालेल्या दोन जहाजांच्या टकरीमुळे संपूर्ण अलिबाग किनारपट्टीचे आणि कुलाबा किनार्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाळूमध्ये झिरपलेल्या तेलाच्या प्रमाणाचे आकडे 'टेरी'ने जाहीर केलेयत. आणि ते धक्कादायक आहेत.

टेरी म्हणजेच द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात हे गंभीर परिणाम समोर आले आहेत. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोलियम हायड्रोकार्बन या किनार्‍यांवर साचले असल्याचे टेरीचे म्हणणे आहे.

हे प्रदूषण विशेषत: कुलाबा आणि अलिबाग समुद्र किनारा या दोन ठिकाणी आढळून आलंय. आंतरराष्ट्रीय नियमानुसार 1 किलो वाळूमध्ये हजार मिलीग्रॅमपेक्षा जास्त तेल असेल तर ते तेल स्वच्छ करण्याची गरज आहे. तसेच नियमानुसार प्रदूषण करणार्‍याने यासाठी दंड भरला पाहिजे.

युरोप, मध्य पूर्वेतील देश आणि अमेरिकेमध्ये या नियमाचे पालन केले जाते. भारतामध्ये मात्र अशी कुठलीही मर्यादा घालून दिलेली नाही.

अलिबागच्या समुद्रकिनार्‍यावर 1 किलो वाळूमागे 60 हजार मिलीग्रॅम म्हणजेच 60 पट जास्त प्रदूषण झालं आहे. तर कुलाब्याजवळ ठरवून दिलेल्या आंतरराष्ट्रीय मर्यादेपेक्षा 381 पट प्रदूषण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close