S M L

डॉ. काबरेंच्या जामिनासाठी प्रयत्न

15 सप्टेंबरसहकार क्षेत्रातील पतसंस्था आणि बँक यांच्या घोटाळ्यांचा जिल्हा अशी आता जळगाव जिल्ह्याची नवीन ओळख होऊ लागली आहे. ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशांचे आपण विश्वस्त आहोत, हे विसरुन मालकी हक्काने या पैशांचा वाट्टेल तसा उपयोग करणार्‍या अनेकांविरुध्द आता गुन्हे दाखल होत आहेत. एरंडोलच्या डॉ. ना. मो. काबरे नागरी सहकारी बँकचे चेअरमन डॉ. काबरे हे 25 ऑगस्ट पासून बेपत्ता आहेत. त्यांच्यावर 25 कोटींच्या अपहाराचा ठपका आहे. काबरेंसह तिघांना पोलिसांनी फरार जाहीर केले आहे. आता अटकपूर्व जामिनासाठी जळगावच्या कोर्टात कायद्याची लढाई सुरु झाली आहे. लेखापरीक्षक आणि पोलीस यांनी हातमिळवणी करुन हा खोटा गुन्हा काबरे यांच्याविरुध्द दाखल केल्याचा दावा काबरेंच्या वकीलांनी केला आहे. तर आमचा पैसा कधी मिळणार ? या ठेवीदारांच्या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणीच देत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 09:55 AM IST

डॉ. काबरेंच्या जामिनासाठी प्रयत्न

15 सप्टेंबर

सहकार क्षेत्रातील पतसंस्था आणि बँक यांच्या घोटाळ्यांचा जिल्हा अशी आता जळगाव जिल्ह्याची नवीन ओळख होऊ लागली आहे. ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशांचे आपण विश्वस्त आहोत, हे विसरुन मालकी हक्काने या पैशांचा वाट्टेल तसा उपयोग करणार्‍या अनेकांविरुध्द आता गुन्हे दाखल होत आहेत.

एरंडोलच्या डॉ. ना. मो. काबरे नागरी सहकारी बँकचे चेअरमन डॉ. काबरे हे 25 ऑगस्ट पासून बेपत्ता आहेत. त्यांच्यावर 25 कोटींच्या अपहाराचा ठपका आहे. काबरेंसह तिघांना पोलिसांनी फरार जाहीर केले आहे.

आता अटकपूर्व जामिनासाठी जळगावच्या कोर्टात कायद्याची लढाई सुरु झाली आहे. लेखापरीक्षक आणि पोलीस यांनी हातमिळवणी करुन हा खोटा गुन्हा काबरे यांच्याविरुध्द दाखल केल्याचा दावा काबरेंच्या वकीलांनी केला आहे.

तर आमचा पैसा कधी मिळणार ? या ठेवीदारांच्या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणीच देत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close