S M L

काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ

15 सप्टेंबरकाश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकमत न झाल्याने आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच जम्मू आणि काश्मीरचा दौरा करणार आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत हा दौर्‍याचा निर्णय घेण्यात आला. पण या दौर्‍याची तारीख नक्की झालेली नाही. लष्कराचा विशेषाधिकार कायदा काढण्याबाबत आजच्या बैठकीत एकमत झाले नाही. भाजप आणि शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, डावे पक्ष, संयुक्त जनता दल आणि समाजवादी पक्षाने कायदा हटवण्यास पाठींबा दिला. दरम्यान, खोर्‍यात हिंसाचार थांबल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या बैठकीला गैरहजर होते. वेगवेगळ्या पक्षांची काश्मीरबाबत काय भूमिका आहे त्यावर एक नजर टाकूयात...काँग्रेस - सशस्त्र दलांचा विशेषाधिकार काढण्यावर चर्चा व्हायला हवी, मंत्रिमंडळात मात्र मतभेद काश्मीरसाठी आर्थिक आणि रोजगाराचं पॅकेज द्यावं फुटीरवाद्यांशी चर्चा करायला हवीअतिरेक्यांसाठी शरणागतीचे धोरण तयार करावेकाश्मीरी पंडीत आणि शिखांसाठी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करावीभाजप - ओमर अब्दुल्लांनी राजीनामा द्यावाकाश्मीरबाबत केंद्र सरकार अंधारात असल्याचा आरोपसशस्त्र दलांचा विशेषाधिकार कायदा हटवण्यास किंवा शिथील करण्यास विरोधफुटीरवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या कोणत्याही चर्चेला विरोधपीडीपी सध्याच्या परिस्थितीला ओमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सच जबाबदार असल्याचा आरोप फुटीरवाद्यांशी केंद्रानं चर्चा करण्याचा आग्रहसशस्त्र दलांचा विशेषाधिकार हटवण्याची मागणी हिंसाचारात 5 ठारदिल्लीत या घडामोडी घडत असताना, काश्मीरमध्ये आजही हिंसाचार सुरूच राहिला. श्रीनगरमध्ये निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. जम्मूमध्येही हिंसाचाराची घटना घडली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात खोर्‍यात 5 जणांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 12:48 PM IST

काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ

15 सप्टेंबर

काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकमत न झाल्याने आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच जम्मू आणि काश्मीरचा दौरा करणार आहे.

काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत हा दौर्‍याचा निर्णय घेण्यात आला. पण या दौर्‍याची तारीख नक्की झालेली नाही.

लष्कराचा विशेषाधिकार कायदा काढण्याबाबत आजच्या बैठकीत एकमत झाले नाही. भाजप आणि शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, डावे पक्ष, संयुक्त जनता दल आणि समाजवादी पक्षाने कायदा हटवण्यास पाठींबा दिला.

दरम्यान, खोर्‍यात हिंसाचार थांबल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या बैठकीला गैरहजर होते.

वेगवेगळ्या पक्षांची काश्मीरबाबत काय भूमिका आहे त्यावर एक नजर टाकूयात...

काँग्रेस -

सशस्त्र दलांचा विशेषाधिकार काढण्यावर चर्चा व्हायला हवी, मंत्रिमंडळात मात्र मतभेद

काश्मीरसाठी आर्थिक आणि रोजगाराचं पॅकेज द्यावं

फुटीरवाद्यांशी चर्चा करायला हवी

अतिरेक्यांसाठी शरणागतीचे धोरण तयार करावे

काश्मीरी पंडीत आणि शिखांसाठी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करावी

भाजप -

ओमर अब्दुल्लांनी राजीनामा द्यावा

काश्मीरबाबत केंद्र सरकार अंधारात असल्याचा आरोप

सशस्त्र दलांचा विशेषाधिकार कायदा हटवण्यास किंवा शिथील करण्यास विरोध

फुटीरवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या कोणत्याही चर्चेला विरोध

पीडीपी

सध्याच्या परिस्थितीला ओमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सच जबाबदार असल्याचा आरोप

फुटीरवाद्यांशी केंद्रानं चर्चा करण्याचा आग्रह

सशस्त्र दलांचा विशेषाधिकार हटवण्याची मागणी

हिंसाचारात 5 ठार

दिल्लीत या घडामोडी घडत असताना, काश्मीरमध्ये आजही हिंसाचार सुरूच राहिला. श्रीनगरमध्ये निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. जम्मूमध्येही हिंसाचाराची घटना घडली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात खोर्‍यात 5 जणांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close