S M L

बँकांच्या व्याजदरात पुन्हा वाढ

16 सप्टेंबरमहागाईकाबूत आणणे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत आरबीआयने आज पुन्हा एकदा पावले उचलली आहेत. बँकांसाठी असणार्‍या व्याजदरांमध्ये आरबीआयने वाढ केली आहे. त्यामुळे बँकांना आरबीआयकडून होणारा अर्थपुरवठा म्हणजेच रेपो रेट महागणार आहे. आता बँकांना आरबीआयकडून 6 टक्क्यांनी कर्ज घ्यावे लागेल, तर आरबीआय आता बँकांकडून 5 टक्क्यांनी पैसा परत घेईल. याचा परिणाम होम लोन आणि इतर कर्जांसाठीच्या व्याजदरांवर होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. होमलोनसाठीच्या व्याजदरांमध्ये लगेच वाढ करणार नसल्याचे एचडीएफसीसारख्या बँकांनी स्पष्ट केले आहे. पण कार लोन आणि इतर ग्राहक कर्ज मात्र महाग होण्याची चिन्हे आहेत. सोबतच येत्या महिन्याभरात बँका ठेवींवरील व्याजदर वाढवतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 10:10 AM IST

बँकांच्या व्याजदरात पुन्हा वाढ

16 सप्टेंबर

महागाईकाबूत आणणे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत आरबीआयने आज पुन्हा एकदा पावले उचलली आहेत. बँकांसाठी असणार्‍या व्याजदरांमध्ये आरबीआयने वाढ केली आहे.

त्यामुळे बँकांना आरबीआयकडून होणारा अर्थपुरवठा म्हणजेच रेपो रेट महागणार आहे. आता बँकांना आरबीआयकडून 6 टक्क्यांनी कर्ज घ्यावे लागेल, तर आरबीआय आता बँकांकडून 5 टक्क्यांनी पैसा परत घेईल.

याचा परिणाम होम लोन आणि इतर कर्जांसाठीच्या व्याजदरांवर होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. होमलोनसाठीच्या व्याजदरांमध्ये लगेच वाढ करणार नसल्याचे एचडीएफसीसारख्या बँकांनी स्पष्ट केले आहे.

पण कार लोन आणि इतर ग्राहक कर्ज मात्र महाग होण्याची चिन्हे आहेत. सोबतच येत्या महिन्याभरात बँका ठेवींवरील व्याजदर वाढवतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close