S M L

राज ठाकरेंच्या सुरक्षेस आम्ही समर्थ - मनसे कार्यकर्ते

27 ऑक्टोबर, मुंबई - राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटका नाट्यानंतर राज्य सरकारने त्यांना दिलेली झेड सुरक्षा काढून घेतल्यानंतर मनसेनं या गोष्टीचा निषेध केलाय.मनसेचे कार्यकर्ते फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आता स्वत:च आपले नेते राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी मनसेच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनी राज ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांना वापरण्यासाठी बोलेरो इन्व्हॅडोर ही गाडी राज ठाकरेंना भेट दिली आहे. सरचिटणीस प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना दिवाळीच्या दिवशी ही अनोखी भेट दिली. राज्य सरकारच्या कृत्याचा निषेध करत म्हणाले, ' आम्हाला आमच्या नेत्याच्या सुरक्षेची व्यवस्था करताना अभिमान वाटतोय '.राज ठाकरे यांना ही गाडी भेट देण्याचा सोहळा राज ठाकरेंच्या निवासस्थानी दादरच्या कृष्णकुंजवर पार पडला. मनसेच्या कार्यकर्त्यांतर्फे राज यांच्यासाठी खाजगी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्या पगारावरचा खर्चही मनसे कार्यकर्त्यांकडूनच करण्यात येणार आहे. राज यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने जरी झटकली असली तरी मनसे आपल्या नेत्याचं संरक्षण करायला समर्थ आहे, असं यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2008 07:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2008 07:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close