S M L

खड्‌ड्यांवरून राजकारण...

अमेय तिरोडकर, मुंबई16 सप्टेंबर खड्डे असलेल्या रस्त्यांवर टोल भरू नये असे, आर. आर. पाटील म्हणाले आणि खड्‌ड्यांबद्दलचे नवे राजकारण सुरू झाले. छगन भुजबळांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दलचे वक्तव्य आर. आर. आबा का करत आहेत, असा प्रश्नही सगळ्यांना पडला आहे. खड्‌ड्यांच्या निमित्ताने आर. आर. पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सामना रंगला आहे. पण यानिमित्ताने खड्डेमाफियांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.राज्यातले रस्ते खड्‌ड्यात गेले आहेत. आणि या रस्त्यांवरून जाताना लोक सरकारचा उद्धार करत आहेत. आर. आर. आबांनी तीच खदखद आडून-आडून बोलून दाखवली. आपण जनतेच्या सोबत आहोत हे आबांना सांगायचे असावे. जनतेची काळजी तुम्हाला नाही, असे म्हणत विरोधी पक्षानेही सरकारवर टीका केली. आर. आर. आबांनी आपल्याला अडचणीत आणले, असे भुजबळांना वाटत असावे. त्यामुळेच, खड्‌ड्यांची काळजी मंत्री म्हणून मलाही आहे, असे भुजबळांनीही न बोलता सुनावले. पावसाळा संपताच खड्डे भरावे लागतील, असे टोल कंपन्यांना सांगण्यात आले आहे. पण मग खड्डे असतानाच्या काळात तरी टोल का माफ केला, गेला नाही हा प्रश्न आता जनता विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 02:04 PM IST

खड्‌ड्यांवरून राजकारण...

अमेय तिरोडकर, मुंबई16 सप्टेंबर

खड्डे असलेल्या रस्त्यांवर टोल भरू नये असे, आर. आर. पाटील म्हणाले आणि खड्‌ड्यांबद्दलचे नवे राजकारण सुरू झाले.

छगन भुजबळांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दलचे वक्तव्य आर. आर. आबा का करत आहेत, असा प्रश्नही सगळ्यांना पडला आहे.

खड्‌ड्यांच्या निमित्ताने आर. आर. पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सामना रंगला आहे. पण यानिमित्ताने खड्डेमाफियांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्यातले रस्ते खड्‌ड्यात गेले आहेत. आणि या रस्त्यांवरून जाताना लोक सरकारचा उद्धार करत आहेत. आर. आर. आबांनी तीच खदखद आडून-आडून बोलून दाखवली.

आपण जनतेच्या सोबत आहोत हे आबांना सांगायचे असावे. जनतेची काळजी तुम्हाला नाही, असे म्हणत विरोधी पक्षानेही सरकारवर टीका केली.

आर. आर. आबांनी आपल्याला अडचणीत आणले, असे भुजबळांना वाटत असावे. त्यामुळेच, खड्‌ड्यांची काळजी मंत्री म्हणून मलाही आहे, असे भुजबळांनीही न बोलता सुनावले.

पावसाळा संपताच खड्डे भरावे लागतील, असे टोल कंपन्यांना सांगण्यात आले आहे. पण मग खड्डे असतानाच्या काळात तरी टोल का माफ केला, गेला नाही हा प्रश्न आता जनता विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close