S M L

गुटखा किंगच्या वादात दाऊदची मध्यस्थी

17 सप्टेंबरगुटखा व्यवसायातील किंग रसिकलाल धारीवाल आणि जगदीश जोशी यांच्या वादात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मध्यस्थी केल्याचा आरोप सीबीआयने मुंबई हायकोर्टात केला आहे. दाऊदचा भाऊ अनिस याला गुटख्याच्या पॅकिंगसाठी दुबईत यंत्र निर्यात केल्याच्या आरोपाबाबत एक खटला सध्या हायकोर्टात सुरू आहे. त्यात धारिवाल आणि जोशी यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत सीबीआयने काल हा खळबळजनक आरोप केला आहे. दाऊदने मध्यस्थी करून 11 कोटी रूपयांमध्ये हा वाद सोडवला, अशी माहितीही सीबीआयने दिली. सीबीआयच्या तपासात ही माहिती स्पष्ट झाल्याचे सीबीआयचे वकिल दरायस खंबाटा यांनी कोर्टाला सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 10:59 AM IST

गुटखा किंगच्या वादात दाऊदची मध्यस्थी

17 सप्टेंबर

गुटखा व्यवसायातील किंग रसिकलाल धारीवाल आणि जगदीश जोशी यांच्या वादात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मध्यस्थी केल्याचा आरोप सीबीआयने मुंबई हायकोर्टात केला आहे.

दाऊदचा भाऊ अनिस याला गुटख्याच्या पॅकिंगसाठी दुबईत यंत्र निर्यात केल्याच्या आरोपाबाबत एक खटला सध्या हायकोर्टात सुरू आहे.

त्यात धारिवाल आणि जोशी यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत सीबीआयने काल हा खळबळजनक आरोप केला आहे.

दाऊदने मध्यस्थी करून 11 कोटी रूपयांमध्ये हा वाद सोडवला, अशी माहितीही सीबीआयने दिली. सीबीआयच्या तपासात ही माहिती स्पष्ट झाल्याचे सीबीआयचे वकिल दरायस खंबाटा यांनी कोर्टाला सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close