S M L

मुळा-प्रवरात गैरव्यवहार नसल्याचा निष्कर्ष

18 सप्टेंबरमुळा-प्रवरा वीज सोसायटीच्या आर्थिक व्यवस्थापनात गैरव्यवहार नाही, असा निष्कर्ष हैदराबादच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने काढला आहे. महावितरण कंपनीची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी मुळा-प्रवरा सोसायटीकडे आहे. त्या संदर्भातील चौकशीचा अहवाल नुकताच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने राज्य वीज नियामक आयोग अर्थात एमईआरसीला दिला. मुळा-प्रवराकडे असलेल्या संपूर्ण थकबाकीचे व्याज आणि विलंब शुल्काचे 650 कोटी रुपये `महावितरण'ने माफ करावेत. तसेच थकबाकीचे उर्वरित 1 हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नेमके सूत्र ठरवावे, अशी शिफारस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने एमईआरसीला केली आहे. थकबाकीच्या मुद्द्यावरून मुळा-प्रवाराचा वीज परवाना रद्द करण्याची मागणी महावितरण कंपनीने एमईआरसीकडे केली होती. त्यानंतर एमईआरसीने चौकशी लावली होती. चौकशी अहवालानंतर आता एमईआरसी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 05:30 PM IST

मुळा-प्रवरात गैरव्यवहार नसल्याचा निष्कर्ष

18 सप्टेंबर

मुळा-प्रवरा वीज सोसायटीच्या आर्थिक व्यवस्थापनात गैरव्यवहार नाही, असा निष्कर्ष हैदराबादच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने काढला आहे. महावितरण कंपनीची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी मुळा-प्रवरा सोसायटीकडे आहे.

त्या संदर्भातील चौकशीचा अहवाल नुकताच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने राज्य वीज नियामक आयोग अर्थात एमईआरसीला दिला.

मुळा-प्रवराकडे असलेल्या संपूर्ण थकबाकीचे व्याज आणि विलंब शुल्काचे 650 कोटी रुपये `महावितरण'ने माफ करावेत. तसेच थकबाकीचे उर्वरित 1 हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नेमके सूत्र ठरवावे, अशी शिफारस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने एमईआरसीला केली आहे.

थकबाकीच्या मुद्द्यावरून मुळा-प्रवाराचा वीज परवाना रद्द करण्याची मागणी महावितरण कंपनीने एमईआरसीकडे केली होती. त्यानंतर एमईआरसीने चौकशी लावली होती. चौकशी अहवालानंतर आता एमईआरसी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close