S M L

गोव्यात सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

18 सप्टेंबरगोव्यात काल सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कुमारजुआ कॅनलमध्ये प्रथेप्रमाणे सातव्या दिवशी सांगोडच्या साहाय्याने हे विसर्जन पार पडले.सांगोड म्हणजे दोन होड्यांच्या साहाय्याने हे विसर्जन केले जाते. मार्शल गावातील कुमारजुवेकरण् देवाची मूर्ती मार्शल गावापासून कुमारजुआ कॅनलपर्यंत नेली जाते. पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर विसर्जन केले जाते. ही 200 वर्षांची प्रथा आहे. पूजनात असलेल्या मूतीर्ंचीही कथा आहे. गावातील एक व्यक्ती आर्थिक संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी गाव सोडून गेली. तेव्हापासून या मूर्तीची पूजा केली जाते. दरवर्षी इथे होड्यांची शर्यत पार पडते. यात गावकरी ऐतिहासिक कथांवर आधारित नाटकेही सादर करतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 05:36 PM IST

गोव्यात सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

18 सप्टेंबर

गोव्यात काल सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कुमारजुआ कॅनलमध्ये प्रथेप्रमाणे सातव्या दिवशी सांगोडच्या साहाय्याने हे विसर्जन पार पडले.

सांगोड म्हणजे दोन होड्यांच्या साहाय्याने हे विसर्जन केले जाते. मार्शल गावातील कुमारजुवेकरण् देवाची मूर्ती मार्शल गावापासून कुमारजुआ कॅनलपर्यंत नेली जाते. पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर विसर्जन केले जाते. ही 200 वर्षांची प्रथा आहे.

पूजनात असलेल्या मूतीर्ंचीही कथा आहे. गावातील एक व्यक्ती आर्थिक संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी गाव सोडून गेली. तेव्हापासून या मूर्तीची पूजा केली जाते.

दरवर्षी इथे होड्यांची शर्यत पार पडते. यात गावकरी ऐतिहासिक कथांवर आधारित नाटकेही सादर करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close