S M L

सोलापूरात दामाजी सहकारी साखर कारखाना संकटात

19 सप्टेंबरसोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातला दामाजी सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक संकटात आहे. पण या कारखान्यातील चार हजार मेट्रीकटन मळी ओढ्यात वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही मळी वाहून गेल्याचा आरोप होत आहे. अडीच कोटींची ही मळी टाक्यांमध्ये योग्य पध्दतीने साठवण्यात आली नाही. टाक्यांमधून मळी ओढ्यात गेल्याने पाणीही प्रदुषीत झाले आहे. तहसिलदार आणि इतर अधिकार्‍यांनी ओढ्याची पाहणी करून गावकर्‍यांनी पाणी पिऊ नये अशी सूचना केली. कारखाना सध्या आर्थिक संकटातून जात असताना व्यवस्थापन एवढा निष्काळजीपणा कसा दाखवू शकते असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2010 12:55 PM IST

सोलापूरात दामाजी सहकारी साखर कारखाना संकटात

19 सप्टेंबर

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातला दामाजी सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक संकटात आहे.

पण या कारखान्यातील चार हजार मेट्रीकटन मळी ओढ्यात वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही मळी वाहून गेल्याचा आरोप होत आहे. अडीच कोटींची ही मळी टाक्यांमध्ये योग्य पध्दतीने साठवण्यात आली नाही.

टाक्यांमधून मळी ओढ्यात गेल्याने पाणीही प्रदुषीत झाले आहे. तहसिलदार आणि इतर अधिकार्‍यांनी ओढ्याची पाहणी करून गावकर्‍यांनी पाणी पिऊ नये अशी सूचना केली.

कारखाना सध्या आर्थिक संकटातून जात असताना व्यवस्थापन एवढा निष्काळजीपणा कसा दाखवू शकते असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2010 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close