S M L

अमरावतीत साथीच्या तापाचा कहर 32 मृत्यू

19 सप्टेंबरअमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात विषाणूजन्य रोगाच्या साथीमुळे गेल्या एक महिन्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मलेरिया, टायफॉईड, डेंग्यूसारखे आजार तालुक्यात झपाट्याने पसरत आहे.दवाखान्यात मात्र औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. या प्रकाराकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.वरूड तालुक्यात सध्या दु:खाचे सावट आहे. साध्या तापाने गौरी इंगळे या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला उपचारांसाठी सरकारी दवाख्यानात नेण्यात आले होते. तिची गंभीर अवस्था पाहून तिला अमरावतीच्या दवाखान्यात नेण्यास सांगितले. पण रस्त्यातच गौरीने जीव सोडला. वरूडच्या ग्रामीण भागात रूग्णालयात पुरेशा खाटा आणि औषधांची ही सोय नाही. एकदा वापरात आणल्या जाणार्‍या सिरींजही पुन्हा वापरल्या जातात. जिल्हाप्रशासनाच्या वतीने निधी देण्यात आला,पण औषध पोहोचायला मात्र वेळ लागत आहे.आमदार निधीतून 2 लाखाची मदत मिळाली मात्र ही मदत सध्या सरकारी फाईलमध्येच आहे. सरकारच्या औषधांसाठी वाट न बघता काही संस्था स्वत:हून पुढे आल्या आहेत. मात्र सरकारी औषधसाठा कधी येतो याची वरूडवासीय वाट बघत आहे. आता या प्रकरणी दुर्लक्ष झाल्याची कबुली आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली आहे. लवकरात लवकर उपाययोजना करण्याचंही त्यांनी आश्वासन दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2010 04:32 PM IST

अमरावतीत साथीच्या तापाचा कहर 32 मृत्यू

19 सप्टेंबर

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात विषाणूजन्य रोगाच्या साथीमुळे गेल्या एक महिन्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मलेरिया, टायफॉईड, डेंग्यूसारखे आजार तालुक्यात झपाट्याने पसरत आहे.

दवाखान्यात मात्र औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. या प्रकाराकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वरूड तालुक्यात सध्या दु:खाचे सावट आहे. साध्या तापाने गौरी इंगळे या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला उपचारांसाठी सरकारी दवाख्यानात नेण्यात आले होते.

तिची गंभीर अवस्था पाहून तिला अमरावतीच्या दवाखान्यात नेण्यास सांगितले. पण रस्त्यातच गौरीने जीव सोडला.

वरूडच्या ग्रामीण भागात रूग्णालयात पुरेशा खाटा आणि औषधांची ही सोय नाही. एकदा वापरात आणल्या जाणार्‍या सिरींजही पुन्हा वापरल्या जातात.

जिल्हाप्रशासनाच्या वतीने निधी देण्यात आला,पण औषध पोहोचायला मात्र वेळ लागत आहे.आमदार निधीतून 2 लाखाची मदत मिळाली मात्र ही मदत सध्या सरकारी फाईलमध्येच आहे.

सरकारच्या औषधांसाठी वाट न बघता काही संस्था स्वत:हून पुढे आल्या आहेत. मात्र सरकारी औषधसाठा कधी येतो याची वरूडवासीय वाट बघत आहे.

आता या प्रकरणी दुर्लक्ष झाल्याची कबुली आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली आहे. लवकरात लवकर उपाययोजना करण्याचंही त्यांनी आश्वासन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2010 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close