S M L

भारताची डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुपमध्ये धडक

19 सप्टेंबरडेव्हिस कप स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. भारताने ब्राझीलचा 3-2 असा पराभव करत वर्ल्ड ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे. रवीवारी झालेल्या परतीच्या एकेरीत रोहन बोपन्नाने ब्राझीलच्या रिकार्डो मेलोचा पराभव करत भारताला 3-2 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. बोपन्नाने सुरुवातीपासूनच मॅचवर वर्चस्व राखले. पहिला सेट बोपन्नानं 6-3 असा सहज जिंकला. पण दुसर्‍या सेटमध्ये मेलोने चांगली लढत दिली. चुरशीचा झालेला हा सेट अखेर बोपन्नाने 7-6 असा जिंकत आघाडी घेतली. तिसर्‍या सेटमध्ये बोपन्नाने मेलोला फारशी संधी न देता हा 6-3 असा सहज जिंकला आणि मॅचही खिशात घातली. त्याआधी सोमदेव देवबर्मनने परतीच्या एकेरीत विजय मिळवत भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली होती. सोमदेवची लढत होती ती ब्राझीलच्या थॉमस बेल्लूसीशी पण दुसरा सेट सुरु असताना बेल्लूसीने दुखापतीमुळे माघार घेतली आणि ही मॅच सोमदेवच्या खात्यात जमा झाली. काल पेस-भूपती जोडीने डबल्समध्ये विजय मिळवत भारताच्या पहिल्या विजयाची नोंद केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2010 05:02 PM IST

भारताची डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुपमध्ये धडक

19 सप्टेंबर

डेव्हिस कप स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. भारताने ब्राझीलचा 3-2 असा पराभव करत वर्ल्ड ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे.

रवीवारी झालेल्या परतीच्या एकेरीत रोहन बोपन्नाने ब्राझीलच्या रिकार्डो मेलोचा पराभव करत भारताला 3-2 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. बोपन्नाने सुरुवातीपासूनच मॅचवर वर्चस्व राखले.

पहिला सेट बोपन्नानं 6-3 असा सहज जिंकला. पण दुसर्‍या सेटमध्ये मेलोने चांगली लढत दिली. चुरशीचा झालेला हा सेट अखेर बोपन्नाने 7-6 असा जिंकत आघाडी घेतली.

तिसर्‍या सेटमध्ये बोपन्नाने मेलोला फारशी संधी न देता हा 6-3 असा सहज जिंकला आणि मॅचही खिशात घातली. त्याआधी सोमदेव देवबर्मनने परतीच्या एकेरीत विजय मिळवत भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली होती.

सोमदेवची लढत होती ती ब्राझीलच्या थॉमस बेल्लूसीशी पण दुसरा सेट सुरु असताना बेल्लूसीने दुखापतीमुळे माघार घेतली आणि ही मॅच सोमदेवच्या खात्यात जमा झाली.

काल पेस-भूपती जोडीने डबल्समध्ये विजय मिळवत भारताच्या पहिल्या विजयाची नोंद केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2010 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close