S M L

बिलालच्या कोठडीला आव्हान

20 सप्टेंबरपुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बिलालला नाशिकच्या कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, नाशिक कोर्टाच्या या निर्णयाला एटीएसने आव्हान दिले आहे. बिलालला पोलीस कोठडी देण्याची मागणी एटीएसने केली. आता यावर उद्या सुनावणी होणार आहे. बिलाल लष्कर -ए- तोयबाशी ई-मेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या नावांनी संपर्कात होता, अशी माहिती एटीएसने कोर्टाला दिली. बिलालचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असे नाशिकच्या वकिलांनी ठरवले आहे.बेगला 28पर्यंत कोठडी पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेल्या हिमायत बेगला 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याला आज पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले. ए. रहेमान यांनी हिमायत बेगचे वकीलपत्र घेतले आहे. रहेमान यांच्याविरुद्ध यावेळी वकिलांनीच घोषणाबाजी केली. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एटीएसने दोघाजणांना अटक केली आहे. हिमायत बेग हा स्फोटाचा मास्टर माईंड आहे, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. हिमायत बेगकडून जप्त केलेली स्फोटके ही आरडीक्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. एटीएसने कोर्टात ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 01:36 PM IST

बिलालच्या कोठडीला आव्हान

20 सप्टेंबर

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बिलालला नाशिकच्या कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, नाशिक कोर्टाच्या या निर्णयाला एटीएसने आव्हान दिले आहे. बिलालला पोलीस कोठडी देण्याची मागणी एटीएसने केली.

आता यावर उद्या सुनावणी होणार आहे. बिलाल लष्कर -ए- तोयबाशी ई-मेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या नावांनी संपर्कात होता, अशी माहिती एटीएसने कोर्टाला दिली.

बिलालचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असे नाशिकच्या वकिलांनी ठरवले आहे.

बेगला 28पर्यंत कोठडी

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेल्या हिमायत बेगला 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याला आज पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले.

ए. रहेमान यांनी हिमायत बेगचे वकीलपत्र घेतले आहे. रहेमान यांच्याविरुद्ध यावेळी वकिलांनीच घोषणाबाजी केली. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी एटीएसने दोघाजणांना अटक केली आहे. हिमायत बेग हा स्फोटाचा मास्टर माईंड आहे, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे.

हिमायत बेगकडून जप्त केलेली स्फोटके ही आरडीक्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. एटीएसने कोर्टात ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close