S M L

प्रक्षोभक विचारांची पेरणी सुरू

20 सप्टेंबरअयोध्येच्या वादग्रस्त जागेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण निकालाच्या दिवशीच विश्व हिंदू परिषदेने दिल्लीत धर्म परिषद भरवली आहे. तर दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटना तसेच मुस्लीम संघटनांनी प्रक्षोभक पत्रके वाटण्यास सुरुवात केली आहे. या सर्व बाबींची दखल घेत पोलिसांनी प्रतिबंधकात्मक पावले उचलली आहेत. राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांचे नेते तसेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी 149 च्या नोटीसा बजावल्या आहेत. याखेरीज दंगलीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या परिसरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 04:23 PM IST

प्रक्षोभक विचारांची पेरणी सुरू

20 सप्टेंबर

अयोध्येच्या वादग्रस्त जागेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण निकालाच्या दिवशीच विश्व हिंदू परिषदेने दिल्लीत धर्म परिषद भरवली आहे.

तर दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटना तसेच मुस्लीम संघटनांनी प्रक्षोभक पत्रके वाटण्यास सुरुवात केली आहे. या सर्व बाबींची दखल घेत पोलिसांनी प्रतिबंधकात्मक पावले उचलली आहेत.

राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांचे नेते तसेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी 149 च्या नोटीसा बजावल्या आहेत.

याखेरीज दंगलीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या परिसरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close