S M L

कोल्हापुरात दलितांवर बहिष्कार

21 सप्टेंबरपुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाहुवाडी तालुक्यातील घुंगुर येथील दलित बांधवाना, स्वातंत्र्यपूर्व काळापासून विहिरीत पाणी भरण्याला आणि मंदिर प्रवेशाला मज्जाव केला होता. पण दलित बांधवांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. पण असे केल्याने अख्ख्या गावाने या दलित बांधवांना वाळीत टाकले आहे. भैरवनाथ देवालय आणि सार्वजनिक विहिरीत पाणी भरण्यास, दलित समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंदी घालण्यात आली आहे. आजही गावात हीच प्रथा गावात सुरू होती. पण सोमवारी या गावातील दलित बांधवांनी भैरवनाथ देवालय परिसरात बैठक घेतली. आणि या विरोधात आवाज उठवायचे ठरवले. त्यानंतर या दलितांनी एकत्र येऊन घागरी घेऊन विहिरीमध्ये उतरून पाणी भरले. त्यानंतर दलितांना प्रवेश नसणार्‍या भैरवनाथ मंदिरात प्रवेश करुन देवाची पूजा केली. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी गावात गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी दलितांना प्रसाद द्यायला नकार दिला. तसेच दलित बांधवावर बहिष्कार टाकला. दलित बांधवांना भैरवनाथ मंदिरात प्रवेश केला तर अनिष्ट घडेल, अशी ग्रामस्थांची समजूत आहे. पण आम्ही यापुढे अन्याय खपवून घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 09:01 AM IST

कोल्हापुरात दलितांवर बहिष्कार

21 सप्टेंबर

पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शाहुवाडी तालुक्यातील घुंगुर येथील दलित बांधवाना, स्वातंत्र्यपूर्व काळापासून विहिरीत पाणी भरण्याला आणि मंदिर प्रवेशाला मज्जाव केला होता. पण दलित बांधवांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे.

पण असे केल्याने अख्ख्या गावाने या दलित बांधवांना वाळीत टाकले आहे. भैरवनाथ देवालय आणि सार्वजनिक विहिरीत पाणी भरण्यास, दलित समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंदी घालण्यात आली आहे.

आजही गावात हीच प्रथा गावात सुरू होती. पण सोमवारी या गावातील दलित बांधवांनी भैरवनाथ देवालय परिसरात बैठक घेतली. आणि या विरोधात आवाज उठवायचे ठरवले. त्यानंतर या दलितांनी एकत्र येऊन घागरी घेऊन विहिरीमध्ये उतरून पाणी भरले. त्यानंतर दलितांना प्रवेश नसणार्‍या भैरवनाथ मंदिरात प्रवेश करुन देवाची पूजा केली.

त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी गावात गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी दलितांना प्रसाद द्यायला नकार दिला. तसेच दलित बांधवावर बहिष्कार टाकला.

दलित बांधवांना भैरवनाथ मंदिरात प्रवेश केला तर अनिष्ट घडेल, अशी ग्रामस्थांची समजूत आहे. पण आम्ही यापुढे अन्याय खपवून घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close