S M L

अहमदनगरमध्ये अतिरिक्त टोलवसुली

21 सप्टेंबरटोळधाडीतून कंत्राटदार लोकांना लुटत असल्याचे एक उदाहरण म्हणजे अहमदनगर - करमाळा रस्ता. या रस्त्याचा खर्च होता, 39.45 कोटी रुपये. मात्र प्रत्यक्षात टोल वसुली झाली आहे. 500 कोटींची. वाढत्या वाहनसंख्येनुसार हा आकडाही 1 हजार कोटींच्या घरात जात असल्याचा अंदाज माहितीच्या अधिकाराच्या आधारे वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर ते कळमाळा हा 80 किलोमीटरचा रस्ता 1995 मध्ये बांधण्यात आला. 1999 पासून या रस्त्यावर टोल वसुली सुरू आहे.नागरी मंचाच्या वतीने माहितीच्या आधिकाराखालीया रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीचे कोणतेही काम झाले नसल्याचे पुढे आले आहे. या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत, मैलाचे दगड नाहीत, संरक्षक भिंती नाहीत, चेंबर नाहीत. गेल्या वर्षी कराराप्रमाणे याचे नूतनीकरण अभिप्रेत असताना प्रत्यक्षात फक्त डागडुजी करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 10:11 AM IST

अहमदनगरमध्ये अतिरिक्त टोलवसुली

21 सप्टेंबर

टोळधाडीतून कंत्राटदार लोकांना लुटत असल्याचे एक उदाहरण म्हणजे अहमदनगर - करमाळा रस्ता. या रस्त्याचा खर्च होता, 39.45 कोटी रुपये. मात्र प्रत्यक्षात टोल वसुली झाली आहे. 500 कोटींची.

वाढत्या वाहनसंख्येनुसार हा आकडाही 1 हजार कोटींच्या घरात जात असल्याचा अंदाज माहितीच्या अधिकाराच्या आधारे वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर ते कळमाळा हा 80 किलोमीटरचा रस्ता 1995 मध्ये बांधण्यात आला. 1999 पासून या रस्त्यावर टोल वसुली सुरू आहे.

नागरी मंचाच्या वतीने माहितीच्या आधिकाराखालीया रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीचे कोणतेही काम झाले नसल्याचे पुढे आले आहे.

या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत, मैलाचे दगड नाहीत, संरक्षक भिंती नाहीत, चेंबर नाहीत. गेल्या वर्षी कराराप्रमाणे याचे नूतनीकरण अभिप्रेत असताना प्रत्यक्षात फक्त डागडुजी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close