S M L

औरंगाबादमध्ये मोराची शिकार

21 सप्टेंबरआपल्याकडे मोरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या शिकारींचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात आज एक मोर मृत अवस्थेत आढळून आला. या मोराचे पंख छाटण्यात आले होते. पंखांसाठीच या मोराची शिकार झाल्याचा अंदाज आहे. शहरातील हिमायतबाग, विद्यापीठ परिसर, जटवाडा, हर्सुल या ठिकाणी मोरांचा वावर आहे. मात्र या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोरांच्या शिकारीचे प्रकार घडतात. त्यामुळे या परिसरातील मोरांची संख्या कमी होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 11:10 AM IST

औरंगाबादमध्ये मोराची शिकार

21 सप्टेंबर

आपल्याकडे मोरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या शिकारींचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात आज एक मोर मृत अवस्थेत आढळून आला.

या मोराचे पंख छाटण्यात आले होते. पंखांसाठीच या मोराची शिकार झाल्याचा अंदाज आहे. शहरातील हिमायतबाग, विद्यापीठ परिसर, जटवाडा, हर्सुल या ठिकाणी मोरांचा वावर आहे.

मात्र या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोरांच्या शिकारीचे प्रकार घडतात. त्यामुळे या परिसरातील मोरांची संख्या कमी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close